‘हम भी, कुछ कम नहीं’--असा खेळ अशी रणनीती

By admin | Published: November 18, 2014 01:07 AM2014-11-18T01:07:27+5:302014-11-18T01:08:52+5:30

फुलेवाडीचा इशारा : अनुभवी रौफखानच्या उपस्थितीमुळे संघात नवचैतन्य

'We too, nothing less' - Such a game is such a strategy | ‘हम भी, कुछ कम नहीं’--असा खेळ अशी रणनीती

‘हम भी, कुछ कम नहीं’--असा खेळ अशी रणनीती

Next

सचिन भोसले - कोल्हापूर -यंदाचा हंगामात आपल्या संघाचा ठसा उमटविण्यासाठी फुलेवाडी क्रीडा मंडळ फुटबॉल संघाने कोलकात्याच्या मोहामेडन, गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स, साळगांवकर स्पोर्टस्, महिंद्रा अँॅड महिंद्रा या संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या रौफखान या आंतरराष्ट्रीय खेळाडूस करारबद्ध केले आहे. त्यामुळे या संघात नवचैतन्य आले आहे. लीग मध्ये अव्वल स्थान मिळविण्याबरोबच नॉक आऊट स्पर्धा जिंकण्यावर भर दिला आहे. त्यामुळे फुलेवाडी क्रीडा मंडळाचा यंदा सर्व संघांना ‘हम भी, कुछ कम नहीं’ असा इशाराच दिला आहे. त्यामुळे फुलेवाडी विरुद्धचे
सर्व सामने अधिक रंगतदार होणार आहेत.
नव्वदीच्या काळात आपल्याही भागाचा संघ कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात असावा म्हणून महादेव शेळके (बापू) यांनी युरोप दौरा केला. या दौऱ्यानंतर फुलेवाडी क्रीडा मंडळाचा फुटबॉल संघाची स्थापना करण्यात आली. सध्या या संघाची ओळख ‘व्यावसायिक संघ’ म्हणून कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात झाली आहे. या संघासाठी अमोल माने, राहुल माने यांनी अनेक वर्षे पाठबळ दिले आहे तर संघाची तयारी युवराज पाटील, अजित वाडेकर, अमर पाटील हे करून घेत आहेत.
प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळण्याचा निर्धार या संघाने केला आहे. त्यादृष्टीने सर्व नवोदितांना सामन्यांमध्ये अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. तंदुरूस्ती राखण्यासाठी जास्तीत जास्त सरावावर भर दिला आहे. सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सराव घेतला जात आहे. क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या या संघाने लीग स्पर्धेचे दोनवेळा उपविजेतेपद मिळविले आहे. यंदा लीगमध्येही अव्वल येण्याबरोबरच नॉक आऊट स्पर्धाही जिंकण्यावर भर दिली जाणार आहे. त्यासाठी कोलकाता येथील रौफखान यांच्याबरोबरच अरुण शु गुप्ता, राजा दास हे राष्ट्रीय खेळाडूही करारबद्ध केले आहेत.

स्टार खेळाडू
रोहित मंडलिक, मोहित मंडलिक, अजित पोवार, रोहित जाधव, तेजस जाधव, रोहित साठे, सुशांत अतिग्रे, सूरज शिगटे, अनिकेत जाधव, अनिकेत तेवरे, मंगेश दिवसे, निखील खाडे



नवोदित खेळाडू हेच आमचे पुढचे स्टार असल्याने त्यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष दिले जाणार आहे. यासाठी आयलीग, ड्युरंड कप खेळलेले खेळाडू संघात करारबद्ध केले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासह कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वालाही होणार आहे. २२ खेळाडूंपैकी १९ खेळाडू हे व्यावसायिक खेळाडू म्हणून आपल्या संघातून खेळत आहेत.
- युवराज पाटील, संघव्यवस्थापक, फुलेवाडी

आमचा संघ प्रत्येक स्पर्धा आणि सामना जिंकण्यासाठीच खेळणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष दिले जात आहे. यासाठी विशेष व्यायाम आणि अडीच तासांचा सराव घेतला जात आहे. व्यावसायिक संघ म्हणून देशातील दर्जेदार खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्या नवोदितांना अधिक होणार आहे.
- अजय वाडेकर, प्रशिक्षक, फुलेवाडी क्रीडा मंडळ


संघातील  जुने खेळाडू असे
अमर पाटील, युवराज पाटील, अभिजित जाधव, अतुल राबाडे, सरदार पाटील, अजित तांबेकर, विलास पोवार, राजू चौगुले, शेळके बंधू, अबिद पेंढारी, अजित वाडेकर, सुनील घाटगे, इंद्रजित सूर्यवंशी, राजू सुळेकर, उदय आतकिरे, उदय सुळेकर, नंदू टिपुगडे, नंदू यादव, भरत माने, दीपक खोत, अमर अपराध, अनिल साळोखे, अनिल भालेकर, शिवाजी संकपाळ, संदीप घाटगे, प्रताप भट आदी

Web Title: 'We too, nothing less' - Such a game is such a strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.