दिव्यांगांसाठी वीस लाख रुपये खर्चून एक वर्षात व्यवसाय हाॅल उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:37+5:302020-12-07T04:18:37+5:30
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे दिव्यांगांसाठी वीस लाख रुपये खर्चून एक वर्षात व्यवसाय हाॅल उभारू, असे प्रतिपादन ...
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे दिव्यांगांसाठी वीस लाख रुपये खर्चून एक वर्षात व्यवसाय हाॅल उभारू, असे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले. ते राष्ट्रीय दिव्यांग दिन आणि वेद अपंग सेवा भावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष गजानन सुभेदार होते.
भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष गजानन सुभेदार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दिव्यांग योजनांची माहिती दिली. यावेळी उपसरपंच राहुल शेटे, मुनीर जमादार, संदीप चौगुले, शिवाजी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब, जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये, उज्ज्वला परमाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बिपिन आलमान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अमित पाटील यांनी आभार मानले.