पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:54+5:302021-07-27T04:26:54+5:30
: मौजे सांगावमधून शासकीय धान्य वाटप योजनेचा प्रारंभ कसबा सांगाव : नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकजुटीने सामना करूया. पूरग्रस्तांना राज्य ...
: मौजे सांगावमधून शासकीय धान्य वाटप योजनेचा प्रारंभ
कसबा सांगाव :
नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकजुटीने सामना करूया. पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मौजे सांगाव ( ता.कागल ) येथे राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून दहा किलो गहू , दहा किलो तांदूळ, पाच लिटर रॉकेल वितरित करण्याचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे आदी प्रमुख उपस्थित होते. मौजे सांगाव ८३ , कसबा सांगाव २४ पूरग्रस्त कुटुंबांना धान्य देण्यात येणार आहे. बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच संदीप क्षीरसागर, ग्रा.पं, सदस्य हरी पाटील, तलाठी दीपक पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.के कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
२६ सांगाव मुश्रीफ
--
फोटो कॅप्शनः मौजे सांगाव येथे पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून अन्न धान्याची मदत करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जि.प सदस्य युवराज पाटील व अन्य मान्यवर.