अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारू : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:50 PM2020-06-01T13:50:33+5:302020-06-01T13:53:01+5:30
महापौर निलोफर आजरेकर, बबनराव रानगे म्हणाले, अहिल्यादेवीचे स्मारक कोल्हापुरात उभारण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्य केली. बालाजी शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले.
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पराक्रमी,धाडसी आणि मनमिळावू होत्या. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नैवेद्याची व अभिषेकाची कायमस्वरूपी सोय त्यांनी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात त्यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मल्हार सेनेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे होते.
महापौर निलोफर आजरेकर, बबनराव रानगे म्हणाले, अहिल्यादेवीचे स्मारक कोल्हापुरात उभारण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्य केली. बालाजी शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबूराव घोडके यांनी सूत्रसंचालन,तर राघू हजारे यांनी आभार मानले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रकाश पुजारी, नगरसेवक राजसिंह शेळके, राहुल माने, अनिल माने, कृष्णात हारुगडे, अमोल हराळे, संतोष शेळके, बाळासाहेब इंगळे आदी उपस्थित होते.
महापालिकेत अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने छत्रपती ताराराणी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
मल्हार सेनेच्या वतीने रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, बबनराव रानगे, वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.