अन्नछत्राच्या मंजुरीकरिता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:51+5:302021-02-15T04:21:51+5:30
क्षीरसागर म्हणाले, या भक्त निवासामुळे भाविकांची मोठी सोय होईल. प्रस्तावित अन्नछत्राची मंजुरी देण्याचे काम न्याय व विधी खात्याकडे आहे. ...
क्षीरसागर म्हणाले, या भक्त निवासामुळे भाविकांची मोठी सोय होईल. प्रस्तावित अन्नछत्राची मंजुरी देण्याचे काम न्याय व विधी खात्याकडे आहे. हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करू. यासह दुधाळीतील दीड एकर जागेत प्रस्तावित असलेल्या भक्त निवासीतील अडचणी दूर करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करू. देवल क्लब येथे होणाऱ्या पॅथाॅलाॅजी लॅबच्या मंजुरीसाठीही पाठपुरावा करू. प्राचीन मंदिरांची देखभाल व दुरुस्ती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनीही मंदिराच्या देखभालीसाठी लागणारा निधी देण्याचे मान्य केले आहे.
डाॅ. योगेश जाधव म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत आहे. त्यांच्या सोईकरीता सुविधांचा आणखी विस्तार करूया. देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी स्वागत केले. प्रस्तावित भक्त निवासाची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
यावेळी देवस्थान समितीचे कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारूदत्त देसाई, आर्किटेक्ट रणजित निकम, आदी मान्यवर उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
शिर्डी संंस्थानाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही शहरातील रस्ते, उड्डाणपूल बांधण्यासाठी पुढे यावे. अशा पायाभूत सुविधा झाल्या तर शहरावरचा भार कमी होईल, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मांडली.
फोटो : १४०२२०२१-कोल-भूमीपूजन
ओळी : कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे ताराबाई रोडवरील जागेत सातमजली भक्त निवास बांधले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन रविवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. योगेश जाधव हस्ते झाले. यावेळी राजाराम गरुड, राजेंद्र जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विजय पवार, शिवाजीराव जाधव, महेश जाधव, वैशाली क्षीरसागर, आदी मान्यवर उपस्थित होते.
(छाया : नसीर अत्तार)