शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:22+5:302021-04-26T04:20:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी हाेताच राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी हाेताच राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिली. संघटनेच्या राज्य कार्यकारी मंडळाची सहविचार सभा ऑनलाईन झाली, त्यामध्ये ते बाेलत हाेते.
राज्य सरचिटणीस हरिष ससनकर यांनी स्वागत केले. राज्य पदाधिकारी आर. जी. भानारकर, वि. स. घटे, विजय भोगेकर, अलका ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ३३ मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. सभेला सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
या मागण्यांवर झाली चर्चा...
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना.
मनपा, नगरपालिका शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे.
जिल्हांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदलीतील त्रुटी दूर कराव्यात.
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग जोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
प्राथमिक शाळेतील सर्वच मुलींना दररोज दहा रुपये उपस्थिती भत्ता मिळावा.
सर्वच विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षक श्रेणी लागू करावी.
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व नांदेड या नक्षलग्रस्त भागासाठी सर्व तरतुदी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू कराव्यात.
शाळांची वीजबिले भरण्यासाठी अनुदान मिळावे.