पुरेशा ऑक्सिजन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:58+5:302021-04-29T04:17:58+5:30

यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी गॅस या प्रकल्पातून होणारा लिक्विड गॅसचा पुरवठा ज्यादा प्रमाणात करण्याबरोबरच बंद असलेला ...

We will provide funds for adequate oxygen production | पुरेशा ऑक्सिजन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करू

पुरेशा ऑक्सिजन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करू

Next

यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी गॅस या प्रकल्पातून होणारा लिक्विड गॅसचा पुरवठा ज्यादा प्रमाणात करण्याबरोबरच बंद असलेला एअर सेपरेशन प्रकल्प सुरू करण्यासाठी शक्य तेथून निधी उपलब्ध करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.

खासदार माने यांनी महालक्ष्मी गॅस प्रकल्पाला भेट देऊन ऑक्सिजन निर्मिती, त्यासाठी लागणारे लिक्विड, तयार आक्सिजन पुरवठा, सुरक्षा व्यवस्था आदींविषयी माहिती घेतली. यावेळी प्रकल्पाचे उपव्यवस्थापक अमर तासगांवे यांनी सविस्तर माहिती दिली.

खासदार माने म्हणाले, बंद असलेला एअर सेपरेशन प्लांट सुरू झाल्यास लिक्विड गॅसची गरज भासणार नाही. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करता येईल. हा प्लांट सुरू झाला तर दिवसाला सहा टन ऑक्सिजन मिळू शकतो. हा प्लांट सुरू करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध न झाल्यास वैयक्तिक निधी उभारून हा प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बी. बी. महामुनी, निरीक्षक श्रीप्रसाद यादव, सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक रवींद्र माने, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, सरदार सुतार, शिवाजी दळवी, महेश कुंभार, रंगराव कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथील महालक्ष्मी गॅसमध्ये प्रकल्पाची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव उपस्थित होते.

Web Title: We will provide funds for adequate oxygen production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.