पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:45+5:302021-07-29T04:24:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात आलेल्या महापुराने शित्तुर वारूण परिसरातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ...

We will provide maximum help to the flood victims | पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ

पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात आलेल्या महापुराने शित्तुर वारूण परिसरातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी केली. येथील नुकसानग्रस्त भागाला जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन उपलब्ध सुविधा व आवश्यक असणाऱ्या गोष्टींचीही आरोग्य विभागाकडून माहिती घेतली. तालुक्यात आलेल्या महापुराने शित्तुर वारूण परिसरातही मोठ्या प्रमाणात शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे तर काही भागात भूस्खलनही झाले आहे. अचानक आलेल्या महापुराने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. दरम्यान, या पूरग्रस्त भागाची जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी पाहणी करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अमरसिंह खोत, माजी उपसभापती बबन पाटील, प्रकाश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: We will provide maximum help to the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.