चुयेकर यांच्या विचारानेच संघाचा कारभार करू: विरोधी आघाडी : प्रकल्पस्थळावर जावून केले वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:45+5:302021-04-23T04:26:45+5:30

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या आवारातील आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विरोधी राजर्षी ...

We will run the team with Chuyekar's thoughts: Opposition Front: We went to the project site and paid our respects | चुयेकर यांच्या विचारानेच संघाचा कारभार करू: विरोधी आघाडी : प्रकल्पस्थळावर जावून केले वंदन

चुयेकर यांच्या विचारानेच संघाचा कारभार करू: विरोधी आघाडी : प्रकल्पस्थळावर जावून केले वंदन

Next

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या आवारातील आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्यांना वंदन केले. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी चुयेकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निश्चय सर्व उमेदवारांनी केला.

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर मंगळवारी सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे जाऊन अभिवादन केले. संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, चुयेकर यांनी मोठ्या कष्टातून गोकुळची स्थापना केली. सर्वसामान्य दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी संघाचा कारभार केला. त्यांच्या या कामाचा आदर्श घेऊन आम्ही यापुढे ही कार्यरत राहू.

माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, आ. राजेश पाटील यांनी चुयेकर यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी, नाविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, रणजित कृष्णराव पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, सुश्मिता राजेश पाटील, श्रीमती अंजना रेडेकर, अमर यशवंत पाटील, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.

२२०४२०२१कोल-गोकूळ विरोधी आघाडी

गोकुळ दूध संघाचे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या गोकुळ शिरगांव येथील पुतळ्याला मंगळवारी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांनी एकत्रित जावून अभिवादन केले.

Web Title: We will run the team with Chuyekar's thoughts: Opposition Front: We went to the project site and paid our respects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.