गांधीनगरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न लोकसहभागातून सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:44+5:302021-03-28T04:22:44+5:30

गांधीनगर (प्रतिनिधी) : गांधीनगर व्यापारी पेठेला भेडसावणारा ट्रॅफिकचा प्रश्न लोकसहभागातून मार्गी लावू, असे मत करवीर उपविभागीय अधिकारी आर. आर. ...

We will solve the problem of traffic congestion in Gandhinagar through public participation | गांधीनगरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न लोकसहभागातून सोडवू

गांधीनगरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न लोकसहभागातून सोडवू

Next

गांधीनगर (प्रतिनिधी) : गांधीनगर व्यापारी पेठेला भेडसावणारा ट्रॅफिकचा प्रश्न लोकसहभागातून मार्गी लावू, असे मत करवीर उपविभागीय अधिकारी आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते गांधीनगर पोलीस ठाणे अंतर्गत विविध व्यापारी असोसिएशनच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस होलसेल रिटेल व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

आर. आर. पाटील म्हणाले, कोल्हापुरातील ट्रॅफिक इन्चार्ज असताना विविध उपाययोजना करून कोल्हापुरातील ट्रॅफिकचा प्रश्न लोकसहभागातून मार्गी लावला होता. तसेच गांधीनगर व्यापारी पेठेला भेडसावणारा ट्रॅफिक जामचा प्रश्न व्यापारी असोसिएशन, स्थानिक ग्रामपंचायत व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मदतीने कायमस्वरूपी सोडवू, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

गांधीनगर व्यापारी पेठेला भेडसावणारे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध व्यापारी असोसिएशन व ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीत गांधीनगर व्यापारी पेठेचे मूळचे दुखणे असणारा ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवता येईल याविषयी चर्चा झाली. त्यावेळी विविध व्यापाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. होलसेल व्यापारी शंकर दुल्हानी यांनी मुख्य रस्त्याच्या मध्ये बॅरिकेड्‌स लावण्याचा मुद्दा उपस्थित केला तसेच व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. गांधीनगर गुड्स मोटर मालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्रान्सपोर्टमध्ये माल लोडिंग-अनलोडिंगची वेळ निश्चित करावी. तसेच व्यापाऱ्यांनीही आपले बुकिंग दिवसभरात देण्यावर ठाम भूमिका घेतली पाहिजे. जेणेकरून ट्रॅफिकवरील ताण कमी होईल. यावेळी होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष पप्पू अहुजा, गांधीनगरचे सरपंच रितू लालवाणी, अविनाश शिंदे, सतीश माळगे, सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कटियार, सुलोचना नार्वेकर यांनी मते व्यक्त केली. या बैठकीस पो.उ.नि. अतुल कदम, होलसेल असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक टेहलानी, रिटेलचे दिलीप कुकरेजा, रमेश वाच्छानी, गोपाल निरंकारी, ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष आयुब जमादार, संतोष तावडे, बंडू सुंदरानी व्यापारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:-गांधीनगर पोलीस ठाण्यात विविध व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी करवीरचे डीवाय.एस.पी. आर. आर. पाटील, सपोनि दीपक भांडवलकर, पो.उ.नि अतुल कदम व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: We will solve the problem of traffic congestion in Gandhinagar through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.