फुलेवाडी रिंगरोडवर लवकरच पोलीस चौकी सुरू करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:04 AM2021-02-20T05:04:07+5:302021-02-20T05:04:07+5:30
शहरासह उपनगरांचा विस्तार होऊ लागला आहे. त्यामुळे उपनगरे पोलीस ठाण्यांपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहेत. या ठिकाणी घडणारे ...
शहरासह उपनगरांचा विस्तार होऊ लागला आहे. त्यामुळे उपनगरे पोलीस ठाण्यांपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहेत. या ठिकाणी घडणारे वादांची वेळीच दखल न घेतल्यास त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होते. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत. जेणेकरून गुन्हेगारी वाढू नये. नागरिकांना छोट्या तक्रारींकरीता पोलीस ठाण्यात यावे लागू नये. याकरीता पोलीस चौकीची संकल्पना पुढे आली आहे. काही वर्षांपूर्वी या सर्व पोलीस चौक्या कार्यरत होत्या. सध्या मात्र, त्या बंद अवस्थेत आहेत. सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण गरम होऊ लागले आहे. त्यात इर्ष्या, चुरशीतून वादाचे प्रसंग घडू नयेत, यासाठी चौक्या सुरू करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना या चौक्या पुन्हा जोमाने कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या मनुष्यबळात या चौक्यांचे नियोजन केले जाणार आहे. निवडणुकीचा विचार करून बोंद्रेनगर ते फुलेवाडी रिंगरोडवर लवकरच पोलीस चौकी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जागेची उपलब्धता तत्काळ झाली तर ही चौकी सुरू होईल. जागा उपलब्ध झाली नाही तरीही ही चौकी तात्पुरत्या तंबूत सुरू केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्पष्ट केले.