सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:32+5:302021-06-22T04:16:32+5:30
केवळ दुकाने सुरू आहेत म्हणून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे, असे नाही. त्यामुळे सम-विषम पध्दतीने सरसकट दुकाने सुरू करण्यास ...
केवळ दुकाने सुरू आहेत म्हणून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे, असे नाही. त्यामुळे सम-विषम पध्दतीने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय व्हावा. अन्यथा, सोमवार (दि. २८) पासून सरसकट दुकाने सुरू केली जातील, असे संजय शेटे यांनी सांगितले.
कोण, काय, म्हणाले?
राजीव परीख : बांधकाम व्यवसायाला निर्बंधातून मुभा द्यावी. बांधकाम साहित्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.
कुलदीप गायकवाड : सम-विषम पध्दतीने दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी.
मुरली रोहिडा : काही नियम घालून सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.
अनिल धडाम : व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा.
चौकट
तर, रोज ५० हजार जणांचे लसीकरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आदी सुविधांचे प्रमाण वाढवले आहे. लसीकरणात कोल्हापूर हे देशात दहाव्या क्रमांकावर आहे. लसीकरणासाठी ३२५ केंद्रे तयार आहेत. पुरेसे डोस उपलब्ध झाल्यास रोज ५० हजार जणांचे लसीकरण करण्याची कोल्हापूरची क्षमता असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दिव्यांगांपाठोपाठ आता को-मॉरबिड मुलांच्या पालकांना लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे, चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
210621\21kol_2_21062021_5.jpg~210621\21kol_3_21062021_5.jpg
===Caption===
फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे,चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे,चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)