मंत्र्यांच्या पाठबळावर तालुक्याचा कायापालट करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:48+5:302020-12-07T04:18:48+5:30
जयसिंगपूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. सध्या १३० ते १४० कोटी रुपयांची विकासकामे सुरू ...
जयसिंगपूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. सध्या १३० ते १४० कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून शिरोळ तालुक्यासाठी मोठा निधी उपलब्ध करण्यास मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठबळावर तालुक्याचा कायापालट करू, अशी ग्वाही जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी केले.
संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे २५-१५ अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष यड्रावकर म्हणाले. संभाजीपूरच्या विकासकामासाठी आम्ही कधीही मागे पडणार नाही. सरपंच अनुराधा कोळी यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास झपाट्याने होत आहे. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच तीन नगरपालिकांना १८ कोटी रुपयांचा निधी देण्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अनुराधा कोळी, उपसरपंच सुनीता कोळी, वर्षा तावरे, रूपाली खाडे, शेखर दाईंगडे, विशाल पवार, मुकुंद गणबावले, विनोद खाडे, फारुख नालबंद, रवींद्र ताडे, रामचंद्र पवार, अमोल शिंदे, प्रवीण हेरले, डॉ. सूरज बुरसे उपस्थित होते. संभाजी कोळी यांनी स्वागत, तर आनंद खाडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक कोळेकर यांनी आभार मानले.
फोटो - ०६१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे अंतर्गत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सरपंच अनुराधा कोळी, संभाजी कोळी, सुनीता कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.