कलावंतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करू : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:41 PM2020-12-23T16:41:06+5:302020-12-23T16:43:16+5:30

culture News Kolhapur- लॉकडाऊनमुळे उपासमार झालेल्या कलावंतांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली साडेतीन कोटींची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलाकार निर्मिती व्यवस्थापक व भरारी पथकाच्या सदस्यांना दिली.

We will try to get financial assistance for artists: Minister Rajendra Patil-Yadravkar | कलावंतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करू : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कलाकार निर्मिती व्यवस्थापक व भरारी पथकाच्या सदस्यांनी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कलावंतांना आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन दिले.

Next
ठळक मुद्देकलावंतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करू मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली ग्वाही

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे उपासमार झालेल्या कलावंतांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली साडेतीन कोटींची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलाकार निर्मिती व्यवस्थापक व भरारी पथकाच्या सदस्यांना दिली.

लालचंद पारिख यांच्या शिष्टमंडळाने मंत्री यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना कलावंतांना भरीव आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी मंत्री यड्रावकर यांनी कलावंतांचे पुनर्वसन करून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने साडेतीन कोटी रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे.

ही रक्कम कलावंतांना मिळवून देण्यासाठी मी शासनदरबारी प्रयत्न करेन. यावेळी चंद्रकांत जगताप, अरुण साळोखे, सुरेंद्र दास, सुनील कुंभार उपस्थित होते.



 

Web Title: We will try to get financial assistance for artists: Minister Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.