झेडएलडी' साठी शासन स्तरावर प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:24+5:302021-03-20T04:23:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असून, भविष्यात उद्योगाला अडचणी येऊ नयेत, यासाठी आताच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असून, भविष्यात उद्योगाला अडचणी येऊ नयेत, यासाठी आताच झिरो लिक्वीड डिस्चार्ज (झेडएलडी) प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले.
शहर परिसरातील टेक्स्टाईल प्रोसेसर्सधारकांनी अडचणीसंदर्भात आमदार आवाडे यांची ताराराणी पक्ष कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी आवाडे म्हणाले, ‘नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन कोणाचीही गय करणार नाही.’
वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता यांनी, शहरातील काही प्रोसेसर्स ४२ दिवसांच्या बंदनंतर आता सुरू झाल्या आहेत. सीईटीपी प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे; परंतु भविष्यातील अडचणी लक्षात घेता झेडएलडी प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पासाठी सहकार्य करावे. संदीप मोघे यांनी, झेडएलडी प्रकल्पासाठी चार एकर जागेची आवश्यकता असल्याने जागा निश्चित केली आहे. त्याचबरोबर हे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. येथून पुढे शासन स्तरावर मंजुरीसाठी आमदार आवाडे यांनी सहकार्य करावे. या प्रकल्पासाठी आवश्यक हिस्सा प्रोसेसर्सधारक देण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी 'ताराराणी' चे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, श्रीनिवास बोहरा, नरसिंह पारीक, संभाजी लोकरे, संदीप सागावकर, राजेश सावंत, आदींसह प्रोसेसर्सधारक उपस्थित होते.
फोटो ओळी
१९०३२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीत प्रोसेसर्सधारकांचा झेडएलडी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.