वाठार चौकात अवैध धंद्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:59+5:302021-08-26T04:26:59+5:30

सुहास जाधव पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वाठार तर्फ वडगाव अवैध धंद्यांचा अड्डा बनले असून राजरोसपणे अनैतिक ...

Weaving illegal trades in Wathar Chowk | वाठार चौकात अवैध धंद्यांना ऊत

वाठार चौकात अवैध धंद्यांना ऊत

Next

सुहास जाधव

पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वाठार तर्फ वडगाव अवैध धंद्यांचा अड्डा बनले असून राजरोसपणे अनैतिक व्यवसाय सुरू आहे. या प्रकाराकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

वाठार परिसरात महामार्गावर लॉजिंग, बोर्डिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, लॉजिंग चालकाच्या स्पर्धेतून अवैध धंदे बिनबोभाटपणे सुरू आहेत.

काही ठिकाणी तर बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय सुरू असून, महामार्गाच्या पुलाखाली, बोगद्यामध्ये राजरोसपणे अनैतिक धंदे सुरू असतात. येथून सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करणेदेखील अवघड बनले आहे. त्याचप्रमाणे लॉजिंगमध्येदेखील अवैध प्रकार सुरू असून, त्याचा परिसरातील शेतकरी, गावकऱ्यांना त्रास होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील एका महिलेला अशा प्रकारचा त्रास झाल्याने संतप्त युवकांनी एकाची धुलाई केली. त्याचप्रमाणे हातभट्टी, अमली पदार्थांची देवाणघेणावदेखील राजरोसपणे सुरू असून, मध्यरात्रीनंतर वेगळ्याच कारणासाठी चौकात टोळके जमा होत असतात.

चौकट

तो पंटर नेमका कोणाचा?

परिसरात एका पंटरने धुमाकूळ घातला असून, अवैध धंद्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याची उघड चर्चा परिसरात आहे. वरदहस्त असल्याचे सांगत ती व्यक्ती चौकात बसून सर्व व्यवहार सांभाळत आहे, तसेच एका विशिष्ट लॉजवर जाण्यासाठी तो ग्राहकांना सूचना देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो पंटर नेमका कोणाचे रक्षण करीत आहे हा कळीचा मुद्दा बनला आहे.

लॉजिंगचे हब

वाठार गावात सध्या १५ पेक्षा लॉजिंग सुरू आहेत. महामार्गावर असल्यामुळे अनेकांनी लॉजिंग बांधले आहे. त्यातील बहुतांश लॉजिंग बाहेरगावच्या लोकांच्या असून, अशा प्रकारांना स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळत असल्याबद्दल नागरिकांमध्ये चीड आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच यावर कारवाई केली नाही तर असंतोष उफाळून येण्याचा धोका आहे.

Web Title: Weaving illegal trades in Wathar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.