शहरातील एलईडीसंदर्भात तक्रारीकरिता वेब पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:30+5:302021-01-08T05:13:30+5:30
कोल्हापूर : शहरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत तक्रारींसाठी १८००१२३२२६७ हा टोल फ्री क्रमांक ...
कोल्हापूर : शहरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत तक्रारींसाठी १८००१२३२२६७ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ज्या भागातील दिवे बंद अथवा नादुरुस्त असतील तर या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिका व ईईएसएल कंपनी यांचे स्ट्रीटलाईट नॅशनल प्रोग्रॅमअंतर्गत ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर शहराचा विस्तार व नागिरकांना पुरेशा प्रकाशाची सोय लक्षात घेता, शहरात एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहेत. सार्वजनिक दिवाबत्तीची देखभाल दुरूस्ती कंपनीमार्फत केली जाणार असल्याने महापालिकेमार्फत नागरिकांच्या सोयीसाठी एलईडी दिवे बंद पडल्यास ऑनलाईन तक्रार करण्याकरिता वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तसेच ‘ईईएसएल’ कंपनी यांना ऑनलाईन तक्रार करण्यासंदर्भात टोल फ्री क्रमांक - १८००१२३२२६७ सुरू करण्यात आलेला आहे. या टोल फ्री नंबरवर एलईडी दिवे बंद पडल्यास नागरिकांनी तक्रारी नोंद कराव्यात, जेणेकरून लवकरात लवकर तक्रारींचे निवारण करण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिकेच्या विदयुत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.