शेतीच्या कारणांवरून परिते येथे विळ्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:13 PM2021-05-27T18:13:19+5:302021-05-27T18:14:19+5:30
Crimenews Kolhapur : शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून विळ्याने व काठीने मारहाण केल्याने आई व मुलगा असे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी करवीर तालुक्यातील परिते येथे घडली. याबाबत चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात, मालुबाई नारायण कारंडे, त्यांचा मुलगा शहाजी नारायण कारंडे (सर्व रा. कुर्डू, ता. करवीर) हे जखमी झाले.
कोल्हापूर : शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून विळ्याने व काठीने मारहाण केल्याने आई व मुलगा असे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी करवीर तालुक्यातील परिते येथे घडली. याबाबत चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात, मालुबाई नारायण कारंडे, त्यांचा मुलगा शहाजी नारायण कारंडे (सर्व रा. कुर्डू, ता. करवीर) हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी: शहाजी कारंडे, त्याची आई मालूबाई कारंडे व वडील नारायण कारंडे हे तिघे परिते (ता. करवीर) येथे कामे करण्यासाठी स्वता:च्या शेतात गेले. त्यावेळी शेजारील शेतकरी असणारे विनायक बाबूराव कारंडे, बाबूराव भाऊ कारंडे, जानूबाई बाबूराव कारंडे, संभाजी भाऊ कारंडे (सर्व रा. कोल्हापूर) यांनी तिघांवर हल्ला चढविला.
विळा व काठीने केलेल्या मारहाणीत शहाजी कारंड, मालूबाई कारंडे हे दोघे जखमी जखमी झाले. शहाजी यांच्या डोक्यात विळ्याचा वार बसला, तर मालूबाई यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.