हलकर्णी येथे भाऊबंदकीच्या वादातून उसावर तणनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:11+5:302021-05-27T04:27:11+5:30
चंदगड - हलकर्णी, ता. चंदगड येथे न्यायालयीन वाद सुरू असलेल्या जमिनीवर ऊस पिकांवर तणनाशकाची फवारणी करून सुमारे चार एकरातील ...
चंदगड - हलकर्णी, ता. चंदगड येथे न्यायालयीन वाद सुरू असलेल्या जमिनीवर ऊस पिकांवर तणनाशकाची फवारणी करून सुमारे चार एकरातील ऊस जळून खाक झाला.याबरोबरच ठिबक सिंचन यंत्रणेचेही पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना जमिनीच्या भाऊबंदकी वादातून झाली. या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांच्याकडे दत्तू गोविंद सावंत यांनी तक्रार दिली आहे.
दत्तू आनंदा सावंत यांच्या मालकीच्या गट नंबर २७९ व ५५५ मधील वाद न्यायालयात गेला आहे. कोर्टाने मनाई आदेश लागू केला आहे. तरीही संशयित शिवाजी स. सावंत व त्यांचे भाचे अशोक भुजबळ, मोहन भुजबळ, महादेव भुजबळ यांनी विषारी औषध फवारणी करून ४ एकरातील सुमारे पाच लाखांचे नुकसान केले. तसेच एक एकरातील ठिबक सिंचनाचेही नुकसान केले आहे. नुकसानभरपाई मिळावी तसेच आपणाला संरक्षण मिळावे, अशी मागणी दत्तू सावंत यांनी पोलिसांत केली आहे.
फोटो ओळी : हलकर्णी, ता.चंदगड येथील दत्तू सावंत यांच्या शेतात विषारी तणनाशक फवारणी करून जाळलेला ऊस.