आठवड्यात प्रभाग रचना जाहीर
By admin | Published: June 29, 2015 12:40 AM2015-06-29T00:40:42+5:302015-06-29T00:40:42+5:30
महापालिका निवडणूक : प्रशासनाची तयारी पूर्ण; ८१ प्रभागांत विभागणी
कोल्हापूर : आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची ८१ प्रभागांत विभागणी होणार आहे. महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक आयोग प्रभाग रचनेची घोषणा करणार आहे. ही नवी प्रभाग रचना आठवड्यात जाहीर होण्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने, निवडणूक कामातील गोपनीयता पाळा; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई अटळ आहे, असा इशाराच कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला आहे. निवडणूक कामकाजाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. नव्या प्रभाग रचनेबाबत उत्सुकता आहे. निवडणूक नव्या प्रभागवार रचनेनुसार होणार असल्याने नगरसेवकांसह इच्छुकांची प्रशासनाकडे विचारणा सुरू आहे.
प्रभाग रचनेचा आराखडा व प्राथमिक तयारी मनपा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मात्र, याबाबतची सर्व माहिती अत्यंत गुप्त ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मानवी हस्तक्षेपाशिवाय गुगल मॅपच्या आधारे संगणकीय प्रणालीने प्रभाग रचना आराखडा तयार होणार आहे. (प्रतिनिधी)