weekend lockdown Kolhapur-गडहिंग्लजमध्ये वीकेंड लॉकडाऊन कडकडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:23 PM2021-04-10T18:23:39+5:302021-04-10T18:25:16+5:30
weekend lockdown Kolhapur Gadhingali : वीकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी दिवसभर गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने बंद होती.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ शटरडाउन झाल्यामुळे २२ मार्च, २०२० ची पुनरावृत्ती दिसली. अौषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा कांही महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
गडहिंग्लज :वीकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी दिवसभर गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने बंद होती.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ शटरडाउन झाल्यामुळे २२ मार्च, २०२० ची पुनरावृत्ती दिसली. अौषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा कांही महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
येथील दसरा चौक, बसवेश्वर पुतळा, कडगाव रोड याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांनीही घरीच राहणे पसंत केले. रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे आणि नेहमी गजबलेले रस्ते, चौक निर्मनुष्य होते. दोन दिवसावर गुढीपाडव्याचा मोठा सण आहे तरीदेखील लॉकडाऊनला व्यापार्यांसह सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.नागरीकांनीही नियमांचे काटकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य केले.
बुगटे आलूरची गुरुदत्त यात्रा रद्द
बुगटे आलूर (ता.हुक्केरी) येथील गरुदत्त देवाची शनिवार (१७) रोजी होणारी वार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द केल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. दरवर्षी गुढीपाडवा ते पंचमी दरम्यान पाच दिवस यात्रा भरते. पालखी व सबिना मिरवणुकीला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. परंतु ,यावर्षी केवळ हक्कदार व मानकर्यांच्या उपस्थितीत उत्सवमूर्तीचे पुजन व अन्य धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पै-पाहुण्यांना आमंत्रित न करता घरीच साधेपणाने यात्रा करण्याचे आवाहन कमिटीने केले आहे.