पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 12:08 PM2022-08-27T12:08:30+5:302022-08-27T12:20:57+5:30

पोलिसांच्या मदतीला १७०० हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील.

Weekly holidays of Kolhapur Police will not be canceled during Ganeshotsav period | पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द

पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द

googlenewsNext

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या काळात इतरांप्रमाणे पोलिसांनाही सणाचा आनंद लुटता यावा. याकरिता त्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करू नयेत, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केली. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बाेलत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, गणेशोत्सव काळात प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील मंडळांच्या बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याविषयी मार्गदर्शन व प्रबोधन करावे. विशेषतः ध्वनिप्रदूषणाबाबतचे प्रबोधन करावे. प्रत्येक मंडळाजवळ एक पोलीस कर्मचारी नियुक्त करावा. सणाच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद लुटता यावा. याकरिता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करू नयेत.

मात्र, २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान अर्जित सुट्ट्या देऊ नयेत. यात वैद्यकीय कारणास्तव अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही अडचण असेल त्यांना त्या दिवशी रजा घेता येईल. पोलिसांच्या मदतीला १७०० हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील. यासह अन्य बाबींचाही आढावा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला.

Web Title: Weekly holidays of Kolhapur Police will not be canceled during Ganeshotsav period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.