इचलकरंजीत आठवडा बाजार १८ ठिकाणी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:35+5:302021-04-01T04:24:35+5:30

इचलकरंजी : शहरामध्ये कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठवडा बाजारामध्ये नागरिक विनामास्क फिरत असून, सोशल डिस्टन्सबाबत बेजबाबदारपणे वागत आहेत. ...

The weekly market in Ichalkaranji will be filled in 18 places | इचलकरंजीत आठवडा बाजार १८ ठिकाणी भरणार

इचलकरंजीत आठवडा बाजार १८ ठिकाणी भरणार

Next

इचलकरंजी : शहरामध्ये कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठवडा बाजारामध्ये नागरिक विनामास्क फिरत असून, सोशल डिस्टन्सबाबत बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे मंगळवार व शुक्रवारचा आठवडा बाजार नियमित बाजाराच्या ठिकाणी न भरता, लॉकडाऊन काळातील नियोजित १८ ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी सनियंत्रण समितीची बैठक येथील पालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी झाली. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक अजित जाधव, शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, प्रकाश मोरबाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणामही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दिनांक २० फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या ३८ दिवसांमध्ये कोरोनाचे १२७ रुग्ण आढळले आहेत. याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती स्फोटक नसली, तरी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शंभर बेडचे कोरोना सेंटर सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.

लस घेण्यासाठी आवाहन

आजतागायत शहर व परिसरातील केवळ वीस टक्के नागरिकांनीच कोरोना प्रतिबंधित लस घेतली आहे. यामध्ये अजूनही वाढ होण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The weekly market in Ichalkaranji will be filled in 18 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.