आठवडी बाजार चालतो, मग आमची दुकाने बंद का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:39+5:302021-07-08T04:17:39+5:30

मुरगूड : कोरोना निर्बंधामुळे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ व्यापार बंद आहे. त्यात कोल्हापूर शहरासह कागल शहरात दुकाने सुरू ...

The weekly market runs, so why are our shops closed? | आठवडी बाजार चालतो, मग आमची दुकाने बंद का?

आठवडी बाजार चालतो, मग आमची दुकाने बंद का?

Next

मुरगूड : कोरोना निर्बंधामुळे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ व्यापार बंद आहे. त्यात कोल्हापूर शहरासह कागल शहरात दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर मुरगूडच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत मुख्याधिकारी हेमंत निकम, तसेच मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना निवेदन देऊन आम्हाला दुकाने चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान आज मंगळवार मुरगूडचा आठवडी बाजारचा वार. कोरोनामुळे बाजार बंद असूनदेखील आज मोठ्या प्रमाणात मुरगूडमध्ये बाजार भरला होता.

शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही याठिकाणी व्यापारी आले असल्याचे समजतात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांनी सोशल मीडियावरून आवाज उठवल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात झाली. याच वेळी मुरगूड शहरातील सर्व व्यापारी मुरगूड नगरपालिका येथे निवेदन देण्यात जमले होते. त्यावेळी त्यांनी आठवडी बाजारामध्ये सोशल डिस्टन्स पालन होत नाही, तसेच जिल्हाधिकारी यांनी अद्यापही आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली नाही, तरी बाजार चालतो. तर आमची दुकाने उघडण्यास परवानगी का नाही, असा संतप्त सवाल केला.

व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी हेमंत निकम याना निवेदन दिले. त्यांनी मुरगूड शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करून, चर्चा करून दुकाने उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असे सर्व व्यापाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी मुरगूड पोलीस स्टेशन येथे मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेऊन त्यांनादेखील निवेदन दिले. मुरगूड व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सदाशिव अंगज, माजी नगरसेवक किरण गवाणकर, माजी अध्यक्ष मोहन गुजर, किशोर पोतदार, आनंदा गोरुले, मधुकर पाटील, राजू चव्हाण, बाबासाहेब मकानदार, अमर चौगुले, ओंकार पोतदार, प्रशांत कुडवे, प्रशांत शहा, उद्धव मिरजकर, किरण मडिलगेकर, प्रशांत सनगर, मयूर शहा, राजू शहा, विनय पोतदार आदी व्यापारी उपस्थित होते.

फोटो ओळ :-

मुरगूड शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सपोनि विकास बडवे यांच्याकडे करताना सर्व व्यापारी.

Web Title: The weekly market runs, so why are our shops closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.