भारत-स्वित्झर्लंड मैत्रीसंबंधांना चालना ‘फ्रेंडशिप बस’चे स्वागत : हैदी चित्रपटाचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:13 AM2018-04-07T01:13:29+5:302018-04-07T01:13:29+5:30
कोल्हापूर : भारत आणि स्वित्झर्लंडमधील मैत्रीपूर्ण कराराला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत दौऱ्यावर निघालेल्या ‘फ्रेंडशिप बस’चे शुक्रवारी कोल्हापुरात उत्साही स्वागत झाले.
कोल्हापूर : भारत आणि स्वित्झर्लंडमधील मैत्रीपूर्ण कराराला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत दौऱ्यावर निघालेल्या ‘फ्रेंडशिप बस’चे शुक्रवारी कोल्हापुरात उत्साही स्वागत झाले. यावेळी दाखविण्यात आलेल्या ‘हैदी’ या स्विस चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संवादात्मक कार्यक्रमातून दोन्ही देशांमधील संस्कृतीची देवाणघेवाण झाली.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये मैत्रीपूर्ण करार झाले. दोन्ही देशांच्या या ७० वर्षांच्या मैत्री वर्षानिमित्त होणाºया सांस्कृतिक उपक्रमांच्या देवाणघेवाणीअंतर्गत स्विस वकिलातीची एक विशेष ‘फ्रेंडशिप बस’ कोल्हापुरात आली. या मैत्रीपर्व उपक्रमांतर्गत स्वित्झर्लंडची भारतातील वकिलात आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे राम गणेश गडकरी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक विजय अय्यर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्रभाकर हेरवाडे, फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिलीप बापट उपस्थित होते.
यानंतर स्वित्झर्लंडचा ‘हैदी’ हा अलायन स्पोनर दिग्दर्शित चित्रपट दाखविण्यात आला. बकºयांचे कळप पाळत आजोबांबरोबर डोंगराळ भागात राहणाºया छोट्या मुलीच्या भावविश्वावर बेतलेल्या या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. चित्रपट दाखविल्यानंतर विजय अय्यर यांनी चित्रपट आणि एकूणच भारत-स्वित्झर्लंड मैत्रीसंबंधांवर रसिकांशी संवाद साधला. ‘फ्रेंडशिप बस’ने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, किशनगड, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, नाशिक व मुंबईला भेट दिली आहे. कोल्हापूरनंतर ही बस आता बेळगाव, कर्नाटक, गोवा, बंगलोरमध्ये जाणार आहे.
——————————
फोटो स्वतंत्र
—————-
इंदूमती
——————-
भारत-स्वीत्झर्लंड मैत्रीसंबंधांना चालना देण्यासाठी भारत दौºयावर निघालेल्या फ्रेंडशीप बसचे शुक्रवारी कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी रसिकांनी स्वीस चित्रपटाच्या पोस्टरसमोर छायाचित्र घेत हा क्षण टिपला.