कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीविरोधात घेतलेल्या भुमिकेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 05:26 PM2017-08-26T17:26:36+5:302017-08-26T17:31:48+5:30
कोल्हापूर : राजारामपुरीतील मंडळींनी प्रथम डॉल्बी गणेशमूर्ती आगमनादिवशी डॉल्बी लावला तर त्याचे पडसाद विसर्जन मिरवणूकीत दिसतात. मग त्यातून अन्य मंडळेही डॉल्बीचा दणदणाट करतात. ही पाश्वभूमी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने काल (शुक्रवारी ) डॉल्बीविरोधी घेतल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. यासह राजारामपुरीचा निकष जिल्ह्यातील इतर मंडळांनाही लावावा अशी अपेक्षाही मंडळांसह नागरीकातून होत आहे.
कोल्हापूर : राजारामपुरीतील मंडळींनी प्रथम डॉल्बी गणेशमूर्ती आगमनादिवशी डॉल्बी लावला तर त्याचे पडसाद विसर्जन मिरवणूकीत दिसतात. मग त्यातून अन्य मंडळेही डॉल्बीचा दणदणाट करतात. ही पाश्वभूमी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने काल (शुक्रवारी ) डॉल्बीविरोधी घेतल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. यासह राजारामपुरीचा निकष जिल्ह्यातील इतर मंडळांनाही लावावा अशी अपेक्षाही मंडळांसह नागरीकातून होत आहे.
उच्च न्यायालयाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. त्यानूसार जर कोणते मंडळ गणेशोत्सवामध्ये अथवा अन्य उत्सवामध्ये ही मर्यादा ओलांडत असेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यानूसारच यंदाच्या गणेशोत्सवात ‘ नो डॉल्बी’ या तत्त्वावर जिल्हा पोलीस प्रशासनाने गणेश आगमन मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणूक व एकूण सणामध्येही डॉल्बी साऊंड सिस्टम लावायचीच नाही असे प्रबोधन सार्वजनिक मंडळांचे केले आहे. तरीही दोन चार मंडळे लाखो रुपये खर्च करुन आगमनादिवशीच अशा प्रकारे निर्देश मोडण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे अशा मंडळांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण आखले आहे.
त्यातीलच एक भाग म्हणून राजारामपुरी मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (काल) गणेश आगमन मिरवणूकीच्या दरम्यान डॉल्बी लावण्याचा मंडळांनी प्रयत्न केला होता. तो पोलीसांनी हाणून पाडला. त्यातून मिरवणूकही डॉल्बीविरहीत नेण्यासाठी भाग पाडले. यावर मंडळांनीही झालेल्या कारवाईबद्दल चकार शब्द न काढता आता ‘ राजारामपुरी’ तील मंडळांना जो कायदा दाखविला त्याप्रमाणे जिल्ह्यातील अन्य डॉल्बी लावणाºया मंडळांबरोबरच राजकारणी लोकांच्या सभा, समारंभातही वाजणाºया डॉल्बीवर कारवाई करुन दाखवावा.
यासह येत्या विसर्जन मिरवणूकीतही शहरासह जिल्ह्यातील इतर मंडळे डॉल्बी लावतील त्यांच्यावरही अशाच कारवाईवर ठाम राहावे. अन्यथा केवळ राजारामपुरी परिसरातील मंडळांवरच धाक दाखविल्याची भावना मंडळांमध्ये निर्माण होईल. असा सूर राजारामपुरीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उमटला. राजारामपुरीतील कारवाईचे जिल्ह्यातील सर्वच नागरीकातून स्वागत करण्यात आले.
कायद्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. राजारामपुरीसाठी एक आणि उर्वरित जिल्ह्यासाठी एक असा नियम न करता सरसकट कायदा मोडणाºयांवर कारवाई करावी.
अॅड. बाबा इंदुलकर,
पोलीसांनी यापुर्वीच कडक शब्दात बंदी म्हणून जाहीर केले असते तर आमच्या मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते. सर्वांसाठी एक न्याय द्या. जिल्ह्यातही हाच निकष लावून पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा.
- अभिजीत शेवडे,
गणेशोत्सव कार्यकर्त्या
एका भागात असा निकष न लावता तो सर्वत्र लावावा. यासह वर्षभरातही त्याची अंमलबजावणी गणेशोत्सवासारखीच व्हावी. दुजाभाव न करता कारवाई होणे अपेक्षित आहे.
- राकेश खाडे,
गणेशोत्सव कार्यकर्ता
सार्वजनिक मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. नियम डावलून डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. सर्वत्र सारखाच नियमांची अंमलबजावणी केली जाईल. कायदा मोडणाºयांवर कारवाई होणार हे निश्चित आहे.
- डॉ. प्रशांत अमृतकर,
शहर पोलीस उपअधीक्षक,कोल्हापूर