देवठाण्याचा पैलवान पृथ्वीराज पाटीलचे दणदणीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:01+5:302021-08-23T04:26:01+5:30
कोल्हापूर : उफा (रशिया) येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करीत देवठाणे (ता. करवीर)च्या पृथ्वीराज पाटील ...
कोल्हापूर : उफा (रशिया) येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करीत देवठाणे (ता. करवीर)च्या पृथ्वीराज पाटील याने कांस्यपदकाची कमाई केली. त्याचे रविवारी प्रथमच कोल्हापूरनगरीत आगमन होताच ताराराणी चौकात कुस्तीशौकिनांच्या वतीने दणदणीत स्वागत करण्यात आले.
पृथ्वीराज याने ९२ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत चुरशीच्या लढतीत रशियाच्या प्रतिस्पर्धी मल्लास २-१ असे गुणांवर हरवीत कांस्यपदकाची कमाई केली. तो शिंगणापुरातील शाहू कुस्ती केंद्रात जालिंदर मुंडे व माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शिवाजी पाटील, प्रशिक्षक सुनील फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील व धनाजी पाटील, वडील बाबासाहेब पाटील, आजोबा मारुती पाटील, श्रीकांत सरनोबत, उद्योजक संतोष गवळी यांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्याच्या या जागतिक कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करून तो प्रथमच रविवारी कोल्हापुरात दाखल झाला. त्याचे स्वागत खासगार धैर्यशील माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, आंतरराष्ट्रीय रेसर कृष्णराज महाडिक, आदींनी त्याचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मल्ल उपस्थित होते.
फोटो : २२०८२०२१-कोल-पृथ्वीराज पाटील
ओळी : कोल्हापुरातील ताराराणी चौकात रविवारी जागतिक कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या पृथ्वीराज पाटीलचे माजी आमदार चंद्रदीप नरके व शौकिनांकडून स्वागत करण्यात आले.