वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:26 AM2017-07-20T00:26:31+5:302017-07-20T00:26:31+5:30

१५ आॅगस्टपूर्वी स्थापन करणार : संभाजी पाटील-निलंगेकर यांची मुंबईतील बैठकीत घोषणा; उद्योगमंत्र्यांची उपस्थिती

Welfare Board for Newspaper Sellers | वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ १५ आॅगस्टपूर्वी स्थापन करू, अशी घोषणा राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगकेर यांनी केली.
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शिवसेना नेते, उद्योगमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, संघटन सचिव संजय पावसे, सदा नंदूर, मनोहर परब उपस्थित होते. राज्य विक्रेता संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील सर्व योजनांचा सहभाग कल्याणकारी मंडळात करण्याचेही मान्य करण्यात आले.
राज्यातील १२२ उद्योग व व्यवसायातील असंघटित क्षेत्रात ३.६५ कोटी कामगार कार्यरत आहेत. अशा कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी युती शासनाने पुढाकार घेतला आहे आणि याकरिताच गेली १०० वर्षे मुंबई शहरासह इतर जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या आणि अथक् कष्ट करून सर्वदूर गावात वेळेत वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले, वृत्तपत्रे व वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र विक्रेते काम करतात. ऊन, वारा, पाऊस, सुख, दु:ख विसरून हे विक्रेते वेळेत वृत्तपत्र पोहोचवण्याचे काम करतात. मात्र हे विक्रेते सतत दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय द्यावाच लागेल, अशी ठाम बाजू त्यांनी बैठकीत मांडली. सुनील पाटणकर यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे स्वरूप, विक्रेत्यांच्या मागण्या सविस्तर मांडल्या. राज्यात साडेतीन लाख वृत्तपत्र विक्रेते कार्यरत आहेत. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या स्वरूपाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
बालाजी पवार यांनी, वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांकरिता घरकुल, आरोग्य, शिक्षण आदी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. विकास सूर्यवंशी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे कल्याणकारी मंडळ स्वतंत्रच असावे. गोरख भिलारे यांनी, कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी नाव नोंदणी करताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेची शिफारस आवश्यक असावी, अशी सूचना मांडली.
यावेळी राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ १५ आॅगस्टपूर्वी कार्यरत होईल, अशी घोषणा कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी केली. १२२ प्रकारच्या असंघटित कामगारांकरिता एकत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे, मात्र त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी खास व भक्कम स्थान असेल. विक्रेत्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. विक्रेता संघटनेने त्यासाठी तात्काळ आपल्या प्रत्येक शहर व जिल्ह्यांतील वृत्तपत्र विक्रेत्यांची आधार कार्डद्वारे नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे त्यांना कल्याणकारी मंडळाचा लाभ तात्काळ मिळण्यास मदत होईल, असेही संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी विकास आयुक्त (विकास) पंकजकुमार, सहाय्यक कामगार आयुक्त सुनीता म्हैसकर, सहसचिव ए. पी. विधले उपस्थित होते.

$$्निराज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Welfare Board for Newspaper Sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.