कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणांनी घर-दार गेले दणाणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:34 AM2020-04-22T11:34:59+5:302020-04-22T11:38:28+5:30

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्याही निदर्शने करण्यात आली.

... went door-to-door with announcements | कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणांनी घर-दार गेले दणाणून

कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणांनी घर-दार गेले दणाणून

Next
ठळक मुद्दे...अन् घोषणांनी घर-दार गेले दणाणूनविविध संघटनेची आंदोलने,आशा,बांधकाम कामगारांचा समावेश

दत्ता पाटील
म्हाकवे/कोल्हापूर  : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातही निदर्शने करण्यात आली.

यामध्ये सिटु अंतर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, इंजीनियरिंग कामगार संघटना आदी संघटनांनी सहभाग नोंदवला. कामगारांनी आपल्या कुटुंबियासह आपल्या दारामध्येच सरकार विरोधी घोषणा देऊन निदर्शने केली.तसेच आशा व गटप्रवर्तक यांनी सुद्धा आज काळ्या फिती लावून काम केले.

सीआयटीयु झिंदाबाद,भाषण नको - रेशन द्या, भाषण नको - वेतन द्या, बांधकाम कामगारांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य मिळालेच पाहिजे,वैधकीय कर्मचार्‍यांना सुरक्षाकीट द्या,कोरोणा टेस्टींगचे प्रमाण वाढवा,स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी पोहोच करा, बिगर आयकर कुटुंबाला महीना ७५०० रूपये अर्थिक मदत द्या, अशा मागण्या करत घोषणा देण्यात आल्या.

यासाठी संघटनेचे सिटुचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मगदूम,आशा संघटक नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, इम्रान जंगले, मोहन गिरी, सुप्रिया गुदले, भगवानराव घोरपडे, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, संगिता पाटील, मनोहर सुतार, विक्रम खतकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
 

आता आंदोलने गल्लीतच..
शासकीय कार्यालयासमोर केलेले आंदोलन हे अधिकारी आणि कामगार यांनाच माहीत असते.परंतु, कामगार आणि असंघटित घटक किती असमाधानी आहे. त्यांचे प्रश्न किती तीव्र आहेत. हे जनतेला समजण्यासाठी कोरोनाच्या नायनाटानंतरही गल्लीत आणि दारातच आंदोलने करणार.
-शिवाजी मगदुम

 

 

Web Title: ... went door-to-door with announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.