अमृतमहोत्सवी वाटचालीत काय गवसले, काय सुटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:46+5:302021-08-15T04:24:46+5:30

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ ...

What did you find and what did you miss during the nectar festival? | अमृतमहोत्सवी वाटचालीत काय गवसले, काय सुटले?

अमृतमहोत्सवी वाटचालीत काय गवसले, काय सुटले?

Next

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ वर्षे हा मोठा टप्पा असतो. देशाच्यादृष्टीनेही साडेसात दशकांची वाटचाल अनेक बऱ्यावाईट बदलांना सोबत घेणारी आहे. यानिमित्त लोकमतने ज्यांच्या आयुष्याची वाटचाल देशाच्या वाटचालीसोबतच झाली अशा समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांना या निमित्ताने बोलते केले. त्यांनी त्यांना भावलेल्या देशाच्या जडणघडणीतील दोन चांगल्या गोष्टी व आजही खटकणारी एक गोष्ट मांडली.

दीपक मिरजे

(ऑटोमोबाइल डिलर)

१९ ऑक्टोबर १९४७

फोटो : १४०८२०२१-कोल-दीपक मिरजे-१५ऑगस्ट

१.अन्नधान्य निर्मितीपासून अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो याचा आनंद आहे. जगातील बिगेस्ट ऑटोमोबाइल इंडस्टी म्हणून भारताचा लौकिक तयार झाला हे मोठे यश आहे.

२.आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. आता जगाचे लक्ष भारताकडे आहे हे पाहून आपलीही छाती आनंदाने भरून येते.

३. जगाच्या पाठीवरील जे देश आपल्यासोबतच स्वतंत्र झाले, ते आपल्या पुढे गेले. कारण त्यांनी आपण देशासाठी काम करतो ही भावना लोकांत रुजवली. आपण राष्ट्रउभारणीत अजूनही कमी पडत असल्याची मनात सल आहे.

------------

नाव : दत्तात्रय दिनकर चौगले,

निवृत्त प्राध्यापक, मुरगूड.

जन्म : दि. १४ जानेवारी १९४७

१) स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रउभारणी ही अत्यंत चांगली गोष्ट झाली. ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या.

२) रस्ते, उड्डाणपूल, विमानतळ, आदी स्वरूपांतील विविध पायाभूत सुविधा चांगल्या विकसित झाल्या.

३) दाभोलकर, पानसरे,कलबुर्गी या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यात देशातील पोलीस, गुप्तचर यंत्रणेला आजही यश आले नाही याची मात्र खंत वाटते.

फोटो (१३०८२०२१-कोल-दत्तात्रय चौगले (स्वातंत्र्य दिन प्रतिक्रिया)

पी. जी. मेढे

(साखर उद्योगाचे अभ्यासक)

१४०८२०२१-कोल- पी. जी. मेढे-१५ ऑगस्ट

जन्मतारीख : ६ सप्टेंबर १९४७

१. देशाने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक व हरित क्रांती केली. अवकाश व संरक्षण तंत्रज्ञानाध्येही देदीप्यमान प्रगती करून महासत्तांच्या पंक्तीत स्थान मिळविले.

२. देशभरातील शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करत आहे. शेती अधिक समृध्द होत आहे, त्याकडे नवी पिढी आकर्षिली जात आहे हे पाहून मनाला आनंद वाटतो.

३. बेरोजगारीच्या समस्येवर अद्याप मात करू शकलेलो नाही. कृषिप्रधान देश असूनही शेतीपूरक उद्योगनिर्मिती व शेतमालाला किफायतशीर भाव देण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही.

Web Title: What did you find and what did you miss during the nectar festival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.