साखर घेऊन करायची काय? पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिकट : सहकारमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:14 PM2018-05-18T23:14:52+5:302018-05-18T23:14:52+5:30

साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी

What to do with sugar? The situation is even worse in the next year: the question of the co-operatives | साखर घेऊन करायची काय? पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिकट : सहकारमंत्र्यांचा सवाल

साखर घेऊन करायची काय? पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिकट : सहकारमंत्र्यांचा सवाल

Next

कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी देशमुख शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटी साखर घेऊन शासन तरी त्या साखरेचे काय करणार आहे. याहीपेक्षा पुढच्यावर्षी परिस्थिती बिकट असल्याचे सूतोवाचही देशमुख यांनी केले.

देशमुख यांना त्यांच्या ‘लोकमंगल’ समूहावर ‘सेबी’ने निर्बंध आणल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कंपनीच्या विस्तारासाठी आम्ही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते विकताना त्यातील काही तरतुदी आम्हाला माहिती नव्हत्या. सीएनीही आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या नाहीत आणि आता त्यातूनच हे निर्बंध आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेअर्सची रक्कम परत केली जाईल. अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी शेअर्स गोळा केले आहेत त्या सर्वांनाच ही अडचण आली आहे.

तासगाव कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू
कोल्हापूर : तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही सहकारमंत्री देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूर येथील विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले. हा कारखाना गेले पाच हंगाम बंद आहे. कारखान्याची एका कंपनीला झालेली विक्रीही लढ्यानंतर रोखण्यात आली.

Web Title: What to do with sugar? The situation is even worse in the next year: the question of the co-operatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.