शेट्टींनी ऐकायचंच नाही ठरवलं तर काय करणार? मुश्रीफ यांनी व्यक्त केली हतबलता
By समीर देशपांडे | Published: November 10, 2023 07:42 PM2023-11-10T19:42:31+5:302023-11-10T19:42:42+5:30
याआधीही कारखानदारांवर किती कर्ज आहे याबद्दल बैठकीत चर्चा झाली आहे.
कोल्हापूर -राजू शेट्टी हे गेल्यावर्षीच्या ऊसाला टनाला ४०० रूपये मागत आहे. जे देणे कारखानदारांना शक्य नाही. हे त्यांना समजावून सांगितले आहे. परंतू त्यांन ऐकायचंच नाही असं ठरवलं असलं तर काय करणार अशी हतबलता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते पोलिस बघून घेतील असेही ते म्हणाले. येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
याआधीही कारखानदारांवर किती कर्ज आहे याबद्दल बैठकीत चर्चा झाली आहे. माझ्या संताजी घोरपडे कारखान्याची साखर विक्रीची जबाबदारीही मी त्यांच्यावर दिली आहे. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर कारखानदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परंतू त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. अजित पवार दिल्लीला का गेलेत याची मला कोणतीही माहिती नाही असेही त्यांनी सांगितले.