काळजाच्या तुकड्यासाठी काय पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:42+5:302021-06-05T04:17:42+5:30

न्यूज नेटवर्क कोपार्डे : हसता बोलता एकुलता १६ वर्षांचा तरुण मुलगा. काविळीची लागण होते आणि उपचार सुरू असताना अचानक ...

But what a piece of sorrow! | काळजाच्या तुकड्यासाठी काय पण!

काळजाच्या तुकड्यासाठी काय पण!

Next

न्यूज नेटवर्क

कोपार्डे : हसता बोलता एकुलता १६ वर्षांचा तरुण मुलगा. काविळीची लागण होते आणि उपचार सुरू असताना अचानक कोमात जातो आणि त्याचे यकृत निकामी झाल्याचा डॉक्टरांचा रिपोर्ट येतो आणि एक हसते खेळते कुटुंब दुःखात बुडून जाते. पण आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आपले काळजीच आईने दिले आहे आणि आपल्या मुलाला पुनर्जन्म दिला आहे. करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी या गावातील ही घटना आहे.

कुणाल अश्विन पाटील याची १२ वीच्या वर्गात शिकणारा आज्ञाधारक मुलगा. वडील अश्विन गावातील सामाजिक उपक्रमात नेहमी पुढे. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. पंधरा दिवसांपूर्वी त्याचे डोळे व शरीर पिवळे दिसू लागले म्हणून कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रथम डेंग्यू व नंतर कावीळ झाल्याचे निदान झाले. आठ दिवसांच्या उपचारानंतर कुणालला घरी सोडण्यात आले.

पण एक दिवस घरी थांबल्यानंतर कुणालला चक्कर आली. सर्व कुटुंब घाबरले. त्याला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले सोनोग्राफी करण्यात आली आणि त्याचे यकृत निकामी झाल्याचा अहवाल आला आणि सगळे कुटुंब व नातेवाईकांच्या पायाखालची वाळू घसरली. अहवाल येण्यापूर्वीच तो कोमात गेला आणि मृत्यूशी झुंज देऊ लागला होता. पण आता यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय उपाय नाही, असे डॉक्टरांनी सल्ला दिला. यासाठी एकतर पुणे अथवा मुंबईला घेऊन जावे लागेल असे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने यासाठी ३० ते ४० लाखांचा खर्च येणार असल्याने बाका प्रसंग निर्माण झाला. कुणालची आई अस्मिता आपल्या मुलाला यकृत देण्यासाठी एका पायावर आई तयार झाली.

बुधवारी पुण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आईचे यकृत काढून कुणालवर यशस्वी यकृत प्रत्यार्पण करण्याची १२ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या मायलेकांची प्रकृती आता ठणठणीत आहे. पण आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आपले काळीज देणारी ती माता धन्यच म्हणावी लागेल. वडिलांनी ही कोणताही विचार करता नातेवाईकांच्या सहकार्याने पैशाची तरतूद केली. पण आता या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.

फोटो १) कुणाल पाटील

२) अस्मिता पाटील -- आई

Web Title: But what a piece of sorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.