न्यायालयाचे निर्बंध फक्त हिंदूंच्या सणासाठीच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:22 PM2017-08-29T18:22:34+5:302017-08-29T18:25:48+5:30

What is the restriction of court only for the festival of Hindus? | न्यायालयाचे निर्बंध फक्त हिंदूंच्या सणासाठीच का?

न्यायालयाचे निर्बंध फक्त हिंदूंच्या सणासाठीच का?

Next
ठळक मुद्देशिवसेना काढणार पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रबोधन करण्यासाठी पदाधिकारी मौलवींची भेट घेणार

कोल्हापूर : पोलीस प्रशासनाची नि:पक्षपातीपणाची भूमिका असावी; पण कोल्हापूर जिल्ह्यात गेली अनेक वर्षे हिंदूंचे पारंपरिक सण साजरे करताना शासनाची परिपत्रके व न्यायालयाच्या आदेशांचा आधार घेत पोलीस प्रशासन दडपशाही करीत आहे. या धोरणाविरोधात जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी पहाटे पाच वाजता बिंदू चौकात महाआरती करून, मशिदीवरील स्पीकरवरून बांग देऊ नका, याबाबत प्रबोधन करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मौलवींची भेट घेणार आहेत.


पवार आणि देवणे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वच निर्णय आणि आदेश हे सर्व धर्मांसाठीच लागू असतात. त्यामुळे कोणत्याही सणांसाठी पोलीस प्रशासनाची भूमिका नि:पक्षपातीपणाची हवी; पण या उलट पोलीस ठाण्यामध्ये हिंदूंच्या पारंपरिक सणापूर्वी बैठका बोलावून, अनेक प्रकारचे निर्बंध घालून सार्वजनिक संस्थांना एक प्रकारची धमकी दिली जाते.

एखादा चांगला उपक्रम राबविताना त्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका सामाजिक स्तरावर जनतेने मान्य केली नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करू, अशा धमक्या दिल्या जातात. ही नवीन प्रथा जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये रूढ होत आहे; पण या दडपशाहीचा भविष्यात निश्चितच स्फोट होईल.


पोलीस प्रशासन हिंदू पारंपरिक सणांच्या वेळी कायद्याचा आधार घेऊन निर्बध घालण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व कायदे फक्त हिंदंूसाठीच का? पोलीस प्रशासन हिंदंूच्या सणांवर दडपशाही करीत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे, असेही पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.


पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी
- जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा, क्रिकेट सट्टा, खासगी सावकारी खुलेआम सुरू आहे. ती बंद करण्याबाबत ठोस कृती कधी होणार?
- जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वारणेत चोरीच्या जप्त केलेल्या पैशांवर पोलीसच डल्ला मारतात. मग चोºया कधी थांबणार?
- कोल्हापुरात अनेक खुनी सापडले नाहीत. पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधासाठी बक्षीस लावत आहे. मग पोलीस यंत्रणा काय कामाची?
 

 

 

Web Title: What is the restriction of court only for the festival of Hindus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.