तिरुपतीच्या धर्तीवर विकासाचा अट्टहास का ?-----भाग - ४

By admin | Published: September 16, 2014 10:42 PM2014-09-16T22:42:05+5:302014-09-16T23:51:22+5:30

बहुजनांची देवता : महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक; आद्यशक्तिपीठ म्हणून व्हावा विकास

What is the significance of the development of Tirupati's character? ----- Part - 4 | तिरुपतीच्या धर्तीवर विकासाचा अट्टहास का ?-----भाग - ४

तिरुपतीच्या धर्तीवर विकासाचा अट्टहास का ?-----भाग - ४

Next

इंदुमती गणेश - कोल्हापूर- अलीकडच्या दोन वर्षांत महालक्ष्मी मंदिराचा विकास तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर व्हावा आणि तेथील सर्व प्रथा-परंपरा येथेही लागू करण्याचा अट्टहास केला जात आहे. मग तो नेत्यांकडून तिरुपती-महालक्ष्मी-पद्मावतीच्या विवाह सोहळ्याचा असो, लाडू प्रसादाचा असो, शालूच्या भव्य मिरवणुकीचा असो, अपॉइंंटमेंटद्वारे दर्शनाचा
विचार असो किंवा स्थानिक उत्सवात अंबाबाईच्या शेजारी तिरूपती बालाजीची मूर्ती उभारण्याचा असो.
या सगळ्या कार्यक्रमांमधून गैरसमजुतीला खतपाणीच घातले जात आहे. अन्य देवस्थानांच्या प्रथा, परंपरांचे अंधानुकरण करण्याऐवजी या देवतेचे खरे रूप ओळखून तिची महाराष्ट्रीय संस्कृती अबाधित राखणे गरजेचे आहे, अन्यथा मंदिराचा मूळ इतिहास पुसला जाईल. महालक्ष्मीलाच विष्णुपत्नी लक्ष्मी समजून साडी घेऊन येण्याची पद्धत वीस वर्षांपूर्वी देवस्थान समितीने सुरू केली, त्यामागे कोणताही धार्मिक संदर्भ नाही. श्रीपूजकांचे म्हणणे ऐकलेच जात नसल्याने त्यांनीही कधी विरोध
केला नाही. समितीचे जुनेजाणते पदाधिकारी, कोल्हापूरचा इतिहास जाणणारी बुजुर्ग मंडळी, महालक्ष्मी मंदिरात पिढ्यान्पिढ्या सेवा देणारे सेवेकरी, मंदिर आणि मूर्ती अभ्यासक, वेदशास्त्र पंडित यांच्यासह कोल्हापूरकरांना माहीत आहे की, ही देवता विष्णुपत्नी नाही, ते उघड-उघड या नव्या पद्धतीबद्दल विरोधही दर्शवितात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महालक्ष्मीला येणाऱ्या भाविकांची संख्या तिपटीने वाढल्याने देवी विष्णुपत्नी असल्याचा चुकीचा प्रसारही तितक्याच झपाट्याने होत आहे. खुद्द कोल्हापुरातील काही संस्था व मंदिराचा मूळ इतिहास
माहीत नसलेली नव्या पिढीतील मंडळी जाणते-अजाणतेपणी हा चुकीचा प्रसार करीत आहेत, जो मंदिराच्या मूळ इतिहासाला, देवीच्या उपासना पद्धतीला छेद देणारा आहे. कारण या मंदिराचे सर्व धार्मिक विधी, परंपरा या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या आहेत.
या देवीचा मूळ प्रसाद शुक्रवारचे फुटाणे असताना लाडू प्रसाद सुरू झाला. रथोत्सवादरम्यान गुजरीतील मंडळाने महालक्ष्मीशेजारी बालाजीची प्रतिकृती उभारली. तिरुपती देवस्थानच्या मदतीतून दोन्ही देवस्थानांना एकत्र जोडून त्याच धर्तीवर महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्याचा कॉर्पोरेट मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीचा विचार केला गेला. हा सगळा प्रकार मूळ इतिहासाला बाधक ठरणारा आहे. या मंदिराचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास नक्कीच व्हावा; पण फक्त पर्यटनवृद्धीसाठी, मार्केटिंंगसाठी श्रीमंत देवस्थानांप्रमाणे तेथील प्रथा-परंपरांचे अंधानुकरण करण्याऐवजी आद्य शक्तिपीठ म्हणून या देवीचे असलेले महाराष्ट्रीय संस्कृतीचे मूल्य जपत या मंदिराचा विकास व्हावा. अन्यथा या मंदिराचा मूळ इतिहास झाकोळला जाऊन दक्षिणेतील नवनव्या प्रथांना सुरुवात होणार आहे, जो देवतेच्या मूळ स्थानाला,
येथील प्रथा-परंपरांना मारक ठरणारा आहे.

वाराणस्या यवाधिकम..
‘आद्यं तु वैष्णंक्षेत्रं शक्त्यागमसमन्वितम भुक्ति-मुक्तिप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकम...’ म्हणजेच हे आद्यवैष्ण क्षेत्र. शक्ती अर्थात सतीमातेच्या अधिष्ठानामुळे भुक्ती व मुक्ती देणारे वाराणसीपेक्षाही यवमात्र श्रेष्ठ आहे. तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेतले नाही तर ही यात्रा परिपूर्ण होत नाही, असा अलीकडे समज झाला आहे. कोणत्याही तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर घरातील कुलदेवतांचे पूजन केले जाते, त्याचप्रमाणे मातृभावनेने आपण केलेली तीर्थयात्रा या जगन्मातेला वंदन करून पूर्ण करायची, असा याचा अर्थ आहे. त्यामागे ते पती-पत्नी असण्याचा संबंध नाही.
 

 

Web Title: What is the significance of the development of Tirupati's character? ----- Part - 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.