कोरोनाकाळात नागरिकांना शासनाच्या गहू, तांदळाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:19+5:302021-06-29T04:16:19+5:30
जयसिंगपूर : सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मे आणि जून या दोन महिन्यांत शासनाच्यावतीने अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना मोफत ...
जयसिंगपूर : सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मे आणि जून या दोन महिन्यांत शासनाच्यावतीने अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटपाचा आधार मिळाला आहे. जवळपास दोन लाख सत्तर हजार नागरिकांना गहू व तांदूळ वाटप करण्यात आले.
शिरोळ तालुक्यात एप्रिलपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. तो कमी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामात गुंतली. एप्रिलपेक्षा मे व जून या दोन महिन्यांत कोरोनाचा शिरकाव आणखीन वाढला. आजअखेर सात हजारांवर रुग्ण पोहोचले असलेतरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने शिधापत्रिकेवर मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ यांचे वाटप करण्यात आले.
अंत्योदय विभागातील ४ हजार ६४२ शिधापत्रिका संख्या असून, यामध्ये २१ हजार ६०० तर प्राधान्यक्रम विभागात ५४ हजार ९०१ शिधापत्रिका असून, २ लाख ८८ हजार नागरिकांना मोफत धान्याचा फायदा झाला आहे. १ हजार ४८ क्विंटल गहू तर ८२६ क्विंटल तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले.