फुलेवाडी केंद्रावर लसीकरण कधी सुरू होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:10+5:302021-05-26T04:24:10+5:30
फुलेवाडी : फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरण कधी सुरू होणार याकडे परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शासनाने ...
फुलेवाडी : फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरण कधी सुरू होणार याकडे परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शासनाने ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसची मुदत ४५ दिवसांवरून ८४ दिवसांची केली आहे. ४५ वर्षांवरील पहिल्या डोसचे बुकिंग होत नाही तर दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. २९ एप्रिलपासून या केंद्रावर पहिला डोस देणे बंद आहे. त्यानंतर येथे कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्डचा दुसरे डोस देण्यात येत होता. आता दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांचे केल्याने या केंद्रावर १३ मेपासून दुसरा डोसही मिळणे बंद झाले आहे. फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्र फुलेवाडी परिसरासह शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरले आहे. लसीकरणासाठी शहरात जाण्यापेक्षा या केंद्रावर सोय झाल्याने नागरिकांचा वेळ व पैशांची बचत झाली होती. मात्र, या केंद्रावर गेल्या कित्येक दिवसांपासून लसच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.