पाणीपुरवठ्याचा ‘खेळखंडोबा’ थांबणार कधी? पुन्हा पुरवठा बंद : दुरुस्तीचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:13 PM2019-11-27T12:13:00+5:302019-11-27T12:14:29+5:30
कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? ...
कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून विचारला जात आहे. चार दिवसांपूर्वी कळंबा टाकी व बुधिहाळकरनगर येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले नाही तोवरच आता शुक्रवारी (दि. २९) चंबुखडीजवळील ब्रेक प्रेशर टॅँकजवळील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या दिवशी ई वॉर्डचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
शिंगणापूर आणि बालिंगा योजनेवरील दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगून प्रत्येक आठवड्याला सतत पाणीपुरवठा खंडित ठेवला जात आहे. पूर्वी कधी तरीच चार-सहा महिन्यांतून एकदा दुरुस्तीचे काम हाती घेतले जात होते; परंतु अलिकडे प्रत्येक आठवड्यात दुरुस्ती काढली जात आहे. दोन्हीपैकी एका योजनेचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्याचा परिणाम निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून, अशा वारंवार खंडित होणाºया पाणीपुरवठ्याला शहरवासीय वैतागले आहेत.
महापुराच्या काळात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सलग १५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी परिस्थिती गंभीर असूनही शहरवासीयांनी वास्तव लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य केले; पण आता सगळी यंत्रणा चांगली असताना, नदीत पाणी मुबलक असताना पुन्हा पुन्हा पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आहे; त्यामुळे लोकांच्या संतप्त भावना आहेत.
श्ािंगणापूर ते कसबा बावडा मार्गावरील चंबुखडी येथील ब्रेक पे्रशर टॅँक येथील विशेष दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. या दिवशी पाणी उपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. परिणामी ई वॉर्डातील पाणीपुरवठा होणार नाही.
पाणी न येणा-या भागांची नावे -
१. ई वॉर्डातील गोळीबार मैदान, संपूर्ण कसबा बावडा, क ागलवाडी, लाईनबाजार, रमणमळा, नागाळा पार्क, कनाननगर, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, मार्केट यार्ड, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपुरी १ ली ते ४ गल्ली, बसंत बहार