कोरोना नियंत्रण दक्षता समिती आहे तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:18+5:302021-08-12T04:28:18+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित रुग्ण ...
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण :
शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित रुग्ण हे रातोरात पळून गेले असल्याने गाव पातळीवरील कोरोना नियंत्रण दक्षता समिती नेमकी आहे तरी कुठे, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना दक्षता समिती ही अहोरात्र राबत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावेळी वेळोवेळी निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात होत्या. त्यामुळेच गावामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र दुर्दैवाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राबणारी कोरोना दक्षता समिती व शासकीय यंत्रणा ही पूर्णता निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ९७७ जणांच्या चाचणी अहवालात एकूण १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी काही जणांना काल (दि. ९) रोजी केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र हे रुग्ण शाळेतून रातोरात पळून गेले आहेत. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचा वावर गावभर सुरू असल्याने कोरोना संसर्गाची बाधा अखंड गावालाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्याचे तहसीलदार व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चौकट -
ज्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये अलगीकरणाची सोय करण्यात आली आहे, तिथे ना धड पाण्याची सोय आहे, ना लाइटची. ना तिथे रुग्णांच्या देखरेखीसाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती.
अलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना आज सकाळी भेटण्यासाठी शाळेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाबाधितांसाठी त्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.
तानाजी भोसले (माजी सरपंच-शित्तूर-वारूण)
ील (सरपंच-शित्तूर-वारूण) आम्ही आमच्या पातळीवर सगळे प्रयत्न करीत आहोत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
नीता पाटील (सरपंच-शित्तूर-वारूण)