‘साडविलकर यांनी शस्त्रे आणली कोठून?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:11 AM2017-11-22T05:11:09+5:302017-11-22T05:11:46+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत.

'Where did Saddivalkar bring the weapons?' | ‘साडविलकर यांनी शस्त्रे आणली कोठून?’

‘साडविलकर यांनी शस्त्रे आणली कोठून?’

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत. ते अवैध गावठी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर शस्त्र खरेदी-विक्री व त्यांच्या दुरुस्तीचा व्यवसाय करीत होते. हा गुन्हा असून त्यांनी अवैध शस्त्रे आणली कोठून, ती कोणाला विक्री केली, कुणाकडून खरेदी केली. त्यातून गुन्हे घडले किती याची चौकशी करावी, अशी तक्रार संशयित आरोपी समीर गायकवाड याने जुना राजवाडा पोलिसांत मंगळवारी केली.
समीरने तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘पानसरे व दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी साडविलकर यांची ‘इन कॅमेरा’ साक्ष झाली. त्यामध्ये त्यांनी सन १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या कालावधीत गावठी पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला आहे, अशी कबुली दिली होती, त्याची सखोल चौकशी व्हावी.

Web Title: 'Where did Saddivalkar bring the weapons?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.