ताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट : डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:28 AM2020-07-23T11:28:25+5:302020-07-23T11:32:07+5:30

अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे.

Where to go if you have a fever? | ताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट : डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

ताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट : डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

Next
ठळक मुद्देताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

कोल्हापूर : अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे.

कोल्हापुरात कोरोनाने हैदोस घातला आहे. रोज शेकडोंनी रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. ताप येणे हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असले तरी तेच एकमेव आहे असेही नाही; पण सध्या आला ताप की लगेच कोविड रुग्णालयाकडे पाठवण्याचा धडाकाच डॉक्टरांनी लावला आहे. त्यामुळे ताप आलेले रुग्ण म्हणजे कोरोनाबाधितच आहेत अशीच त्यांच्याशी वर्तणूक केली जात आहे.

किरकोळ ताप आला तर अँटीबायोटिक गोळ्या घेऊन दोन-तीन दिवसांत बरे होता येते, पण रुग्ण आला तर डॉक्टर त्यांना तपासण्याचीही तसदी घेत नाहीत; त्यामुळे ताप अंगावर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही खूप त्रास होतोय म्हणून गेल्यावर थेट सरकारी रुग्णालयात स्राव तपासणीसाठी पाठवले जात आहे.

तासाभरात होत्याचे नव्हते

अशीच एक घटना घडली आहे, सध्या कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या इचलकरंजी शहरात. एक धडधाकट महिला. जरासा ताप आला म्हणून दवाखान्यात गेली तर एकाही डॉक्टरने उपचार केले नाहीत. दोन दिवस असेच तापात गेले. अखेर तिसऱ्या दिवशी थेट आयजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले. सकाळी १० वाजता दवाखान्यात गेलेल्या या महिलेचा ११वाजता मृतदेहच बाहेर आणावा लागला. तासाभरात होत्याचे नव्हते झाले होते.


सर्दी, ताप औषध देऊन बरा होतो की नाही बघण्याऐवजी थेट कोविड सेंटरला भरती केले जात आहे. अगोदरच घाबरलेल्या पेशंटला धीर देण्याऐवजी थेट भीतीच्या वातावरणात ढकलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने थंडी-ताप असणाऱ्या रुग्णावर दिल्ली सरकारप्रमाणे प्रथम घरी प्रथमोपचार करावेत. जर उपचाराला प्रतिसाद देत नसेल, तरच कोविड सेंटरला नेऊन उपचार करावेत.
- मोहन खोत,
एक त्रस्त नागरिक

Web Title: Where to go if you have a fever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.