धरणे भरणार की नाही याची धास्ती

By admin | Published: August 7, 2015 10:54 PM2015-08-07T22:54:54+5:302015-08-07T22:54:54+5:30

अपुऱ्या पावसाचा परिणाम : जलविद्युत निर्मिती ठप्प, उन्हाळ््यात पाणी प्रश्न उद्भवणार

Whether it will fill up the dharna or not | धरणे भरणार की नाही याची धास्ती

धरणे भरणार की नाही याची धास्ती

Next

राधानगरी : अपुरा पाऊस होऊनही शेतकऱ्यांनी कशीतरी शेतीकामे उरकली खरी, मात्र अशीच स्थिती राहिल्यास उन्हाळ््यात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांची धास्ती निर्माण झाली आहे. दरवर्षी या काळात ‘ओव्हर फ्लो’ होणारी धरणे भरतात की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय यावर्षी जलविद्युत निर्मिती ठप्प झाल्याने मोठे नुकसान संबंधितांना सोसावे लागणार आहे. राधानगरी व काळम्मावाडी येथील वीज केंद्रांतून गतवर्षी जवळपास पन्नास लाख युनिट वीज निर्मिती या काळात झाली होती.
राधानगरीच्या ऐतिहासिक लक्ष्मी तलावाच्या सभोवताली अभयारण्याचे संरक्षण कवच असल्याने येथे प्रचंड पाऊस कोसळतो. परिणामी महिन्याभरातच धरण पूर्ण भरू शकते. म्हणून येथील दोन्ही केंद्रांतील जलविद्युत निर्मिती जूनपासूनच सुरू होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू होतात. गतवर्षी पावसाच्या सुरुवातीला २.४0 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक होता. जूनपासून ‘महाजनको’च्या केंद्रांतून ३१ जुलैपर्र्यंत ६५ हजार युनिट, तर सप्टेंबरपर्यंत दोन लाख ५७ हजार युनिट वीज तयार झाली होती. मोहिते कंपनीच्या केंद्रातून केवळ जुलै माहिन्यातच २२ लाख, तर जून महिन्यात दहा लाख युनिट वीज निर्माण झाली होती.
गतवर्षी ३१ जुलैपर्यंत २७५७ मि. मी. पाऊस झाला होता. धरणात ७.९१ टी.एम.सी. पाणी होते. १ आॅगस्ट २0१४ रोजी स्वयंचलित दरवाजे सुरू झाले होते.
यावर्षी येथे १८३६ मि.मी. पाऊस झाला आहे, तर धरणात ५.८२ टी. एम. सी. पाणीसाठा आहे.
यावर्षी केवळ ‘महाजनको’च्या केंद्रातून चाचणीसाठी पाणी
सोडल्याने ११ हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण अशी ओळख असणाऱ्या काळम्मावाडी येथील शाहू सागर जलाशयाचीही अपूर्णच स्थिती आहे. येथे मे २0१४ अखेर धरणात ६.३४ टी.एम.सी. पाणी शिल्लक होते. ३१ जुलै २0१४ पर्यंत येथे १८८२ मि.मी. पाऊस होऊन पाणीसाठा १६.१९ शिल्लक राहिला होता. शिवाय या काळात वीजनिर्मिती केंद्रात सोडलेल्या पाण्यामुळे २८ लाख ६३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली होती.
यावर्षी ३१ मे अखेरीस ७.३६ टी. एम. सी. इतका पाणीसाठा होता, तर केवळ १२८७ मि. मी. पाऊस पडल्याने ३१ जुलैचा पाणीसाठा १४.४६ टी. एम. सी. झाला आहे. हे धरण पूर्ण भरायला अजून ११ टी. एम. सी. पाणीसाठा कमी आहे. पावसाची स्थिती पाहता, हे धरण भरण्याची अनिश्चितता आहे. असे झाल्यास उन्हाळ््यात पाण्याच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Whether it will fill up the dharna or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.