एक हजार एकशे अकरापैकी कोणत्या १६ उमेदवारांना मिळणार नोकरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:45 AM2020-02-03T11:45:58+5:302020-02-03T11:48:52+5:30

उद्या, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संदर्भात हरकती देता येणार आहेत. यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सरळसेवेनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर भरती होत असून, जादा गुण असणाऱ्यांना संधी मिळणार आहे.

Which one of the 1000 candidates will get a job in the 1000? | एक हजार एकशे अकरापैकी कोणत्या १६ उमेदवारांना मिळणार नोकरी?

एक हजार एकशे अकरापैकी कोणत्या १६ उमेदवारांना मिळणार नोकरी?

Next
ठळक मुद्दे१६ पदांसाठी ११११ उमेदवारांनी दिली परीक्षा-कोल्हापूर महापालिका नोकरभरती

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेमध्ये विविध प्रकारच्या अनुसूचित जमातीसाठी वर्ग-४ मधील १६ जागांसाठी रविवारी लेखी परीक्षा झाली. अर्ज केलेल्या १८०० पैकी ११११ उमेदवारांच्या परीक्षेला उपस्थिती लावली होती. रात्री नऊच्या सुमारास उत्तरपत्रिकेच्या स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले.

कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, ड्रेसर, वाहनचालक, मीटर रीडर, शिक्षणसेवक अशा १६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विवेकानंद कॉलेजमध्ये रविवारी दुपारी १२ ते २ या वेळेत लेखी परीक्षा झाली. यानंतर उत्तरतालिका (अ‍ॅन्सर की) आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संदर्भात हरकती देता येणार आहेत. यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सरळसेवेनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर भरती होत असून, जादा गुण असणाऱ्यांना संधी मिळणार आहे. परीक्षेसाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, करनिर्धारक दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी सुधाकर चिल्लावाड यांनी काम पाहिले. यासह शिक्षण समिती, महापालिकेतील ३०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते.

पद भरती जागा परीक्षा दिलेले उमेदवार
कनिष्ठ लिपिक ४ ३०५
शिपाई ४ ३६७
पहारेकरी ३ १४८
वाहनचालक १ १०
ड्रेसर १ १३
मीटर रीडर १ १०
कनिष्ठ लिपिक : केएमटी १ १४२
केएमटी वाहक १ १००
--------------------------
एकूण १६ ११११

 

Web Title: Which one of the 1000 candidates will get a job in the 1000?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.