सत्ता कुणाची?

By admin | Published: February 23, 2017 12:49 AM2017-02-23T00:49:25+5:302017-02-23T00:49:25+5:30

उत्सुकता शिगेला; दुपारी चारपर्यंत चित्र होणार स्पष्ट

Which power? | सत्ता कुणाची?

सत्ता कुणाची?

Next



कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता नेमकी कुणाकडे याचा फैसला आज, गुरुवारी होणार आहे. मंगळवारी ईर्ष्येने ७७ टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वच उमेदवारांच्या ‘उरात होतंय धडधड’ अशी अवस्था झाली असून, आज, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच राजकीय हालचाली वेगावणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ९०५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (दि. २१) मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त झाले. अतिशय अटीतटीने आणि ईर्ष्येने सरासरी ७७ टक्के मतदान झाले. आज, गुरुवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि नोडल आॅफिसर विवेक आगवणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी दहा वाजता सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल व ती जाहीरही करण्यात येईल. मतमोजणीसाठी एकूण सातशे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यानंतर मग गटनिहाय मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गगनबावडा तालुक्यात दोनच गट असल्याने येथील निकाल दुपारी बारापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. पन्हाळा वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये एकेका गटाची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला एक गट घेतला जाईल. सर्व केंद्रांची मतदान यंत्रे त्या टेबलांवर घेतली जातील आणि त्यांची मोेजणी होईल. यानंतर गणांची मतदान यंत्रे घेऊन त्याच टेबलांवर गणांचीही मोजणी होईल. एका गटाची आणि त्या अंतर्गतच्या दोन गणांची मोजणी झाल्यानंतर त्या गटातील प्रतिनिधींना बाहेर पाठवून दुसऱ्या गटाच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गटाची मोजणी सुरू होणार आहे.
.........................
मतमोजणीसाठीची टेबलांची संख्या
अ. नं. तालुकाटेबल्सची संख्या
१करवीर३५
२गगनबावडा१२
३पन्हाळा२४
४शाहूवाडी२५
५राधानगरी२१
६कागल२४
७हातकणंगले२४
८शिरोळ१९
९भुदरगड२७
१०चंदगड१२
११आजरा१६
१२गडहिंग्लज३४
..................................
एकूण२७३
-------------------
२२0२२0१७-कोल-बंदोबस्त
रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये करवीर तालुक्यातील मतदान यंत्रे ठेवण्यात आली असून तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Which power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.