पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:58 AM2019-02-14T00:58:17+5:302019-02-14T00:59:05+5:30

लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या

 While criticizing the leaders, the leaders of both the groups-Mahadik: personal mudslide | पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक

पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक

googlenewsNext

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची अंतर्गत मदत होणार असल्याने ते त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. तर गेली साडेचार वर्षे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध त्यामुळे महाडिक भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करूच शकत नाहीत. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत व्यक्तिगत उणीदुणी हाच प्रचाराचा मुद्दा राहणार, हे निश्चित आहे.

राष्टवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनाच आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण त्यांची प्रचाराची पद्धत पाहिली तर ते केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्यास टाळतात. त्याला कारणेही तशीच आहेत, गेली साडेचार वर्षे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. भीमा कृषी प्रदर्शनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘धनंजय महाडिक हे आमची मुलगी आहेत, जरी त्यांनी मनाविरुद्ध लग्न केले तरी त्यांच्यावरच प्रेम असणार’ असे वक्तव्य करून भाजप जिल्ह्यात कोणाला मदत करणार हे त्यांनी जाहीरच केले. त्यामुळे महाडिक हे भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रमक होण्याची शक्यता कमी असून, त्यांचा प्रचाराचा रोख संजय मंडलिक यांच्यावरच राहणार आहे.
संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून ते कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्याच्या जवळ गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसला उघड मदत करण्याची भूमिका घेऊन लोकसभेसाठी ‘सॉफ्ट कॉर्नर’चा प्रयत्न आहे. कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तर मंडलिक यांना उघड मदत करण्याची घोषणा केली आहे; तर राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मंडलिक यांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिला. यामध्ये कागल विधानसभेचे राजकारण दडले असले तरी महाडिक यांचे पक्षांतर्गत राजकारणही कारणीभूत आहे. यामुळे मंडलिक थेट कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांवर टीकाटिपणी करण्यास टाळाटाळ करीत

Web Title:  While criticizing the leaders, the leaders of both the groups-Mahadik: personal mudslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.