वडगावात देशी वाहतूक करताना कारसह २३ बॉक्ससह सुगंधित पानमसाला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:23+5:302021-05-15T04:22:23+5:30
या प्रकरणी जयसिंग रंगराव वड्ड (घुणकी) हा फरारी झाला.तर संग्राम भीमराव पाटील (वय २० रा नवे पारगांव ) ...
या प्रकरणी जयसिंग रंगराव वड्ड (घुणकी) हा फरारी झाला.तर संग्राम भीमराव पाटील (वय २० रा नवे पारगांव ) असे गुन्हा नोंद झालेल्यांचे नाव आहे.याबाबत फिर्याद पोलिस नाईक दादासो शिवाजी माने यांनी दिली.
घुणकी - चावरे रस्त्यावर कार (एम एच ११ ए डब्लू ४०५८) मधून विना परवाना साठा करून विक्रीसाठी येऊन जात होता.त्यास वडगाव पोलिसानी रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र वड्ड हा फरारी झाला. या कारमध्ये देशी दारूचे २३ बॉक्स जप्त करण्यात आले.ही कारवाई काल गुरूवारी साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.
दरम्यान, नवे पारगांव येथील अमृतनगर फाटा येथील संग्राम बेकरीत बंदी घालण्यात आलेला सुगंधी पानमसाला ३५४ पान मसाला व सुगंधित तंबाखू साठा मिळून आला.ही कारवाई आज शुक्रवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली.ही कारवाई पोलीस नाईक अमरसिंह पावरा, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने केली.तपास पोलिस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.
फोटो ओळ
पेठवडगाव : वडगाव पोलिसांनी घुणकी येथे देशी दारू तर अमृतनगर फाटा येथे सुगंधित पानमसाल्यासह कार जप्त करण्यात आली.यावेळी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह तपास पथकातील अमरसिंह पावरा, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, प्रमोद चव्हाण आदीचा समावेश होता.(छाया संतोष माळवदे)