कुजबुज -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:14+5:302021-06-26T04:17:14+5:30
मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे जिव्हाळ्याचा विषय ! त्यासंदर्भातील आंदोलनाला आता सर्वव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे, विचारांचे ...
मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे जिव्हाळ्याचा विषय ! त्यासंदर्भातील आंदोलनाला आता सर्वव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे, विचारांचे कार्यकर्ते त्यात सामिल झाले आहेत. आपापले हेतू साध्य करताना दिसत आहेत. सुरुवातीला पेठेतील कार्यकर्त्यांनी आंदोलनात पुढाकार घेतला. त्यांच्या या पुढाकारात विशिष्ट मंडळींनी शिरकाव केला. आम्ही आमच्या ‘चपला’ बाहेर काढून आलो आहोत, असे सांगण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला. पेठेतील कार्यकर्ते सरळमार्गी. त्यांनीही त्यांना सोबत घेतलं. ताराराणी चौकात चक्काजाम आंदोलन झालं. प्रत्येकाच्या नजरा एकमेकांवर खिळल्या, तेव्हा ध्यानात आलं की, प्रत्येकाच्या ‘चपला’ वर एका विशिष्ट पक्षाची, विचाराची, विशिष्ट कार्यकर्त्यांची छाप होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचं राजकरणं सुरू असल्याचं लक्षात आलं. त्यांचा खरा चेहरा कळला. शेवटी आंदोलन झाल्यानंतर दोन दिवसांनी पेठेतील कार्यकर्त्यांना झालेली चूक लक्षात आली आणि त्यांची चपलाखीसुद्धा ! राज्य सरकार निर्णय घेत असताना आंदोलन केल्याबद्दल त्यांचा निषेधही केला.
भारत चव्हाण -