कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:10+5:302021-07-10T04:17:10+5:30
जिल्हा परिषदेतील हातकणंगले तालुक्यातील हे सदस्य म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. दिलखुलास स्वभाव. विनोदी किश्श्यांचा त्यांच्याकडे खजिनाच. पाच, सात जिल्हा परिषद ...
जिल्हा परिषदेतील हातकणंगले तालुक्यातील हे सदस्य म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. दिलखुलास स्वभाव. विनोदी किश्श्यांचा त्यांच्याकडे खजिनाच. पाच, सात जिल्हा परिषद सदस्य एकत्र बसले असतील आणि तिथून जर हास्याचे फवारे उडत असतील तर निश्चित ओळखायचे तिथे ‘प्रसाद’ आहेच. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले की, मी फुकट सल्ला देतो म्हणून कोणी ऐकत नाही, पण केवळ मान हलवून मी वजन कमी करून दाखवतो. ते कसे असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, कुणीही खायला समोर काही ठेवले की, नाही म्हणून मान हलवायची आपोआप वजन कमी होतंय. त्यांच्या या अजब सल्ल्यावर मात्र उपस्थितांनी हसून दाद दिली. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ‘मी खोबऱ्यांचा प्रसाद’अशी ओळख करून देणारा असा हा अवलिया. समीर देशपांडे