कुजबुज -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:19+5:302021-07-17T04:19:19+5:30
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग का कमी होत नाही याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी केंद्र शासनाची एक कमिटी येऊन गेली. जिल्हाधिकारी कार्यालयातील ...
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग का कमी होत नाही याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी केंद्र शासनाची एक कमिटी येऊन गेली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर कमिटीतील मंडळी भोजनासाठी शासकीय विश्रामगृहावर थांबले. जेवता जेवता त्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्राला भेट देण्याचा निर्णय घेतला. अचानक कमिटी येणार म्हटल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धावपळ उडाली. सर्वच केंद्रावरील लसीकरण संपण्याच्या मार्गावर होते. गर्दी तर नव्हतीच. लसीकरण सुरू आहे हे दाखविण्यासाठी बाहेर लाभार्थी थांबले, असे दाखवायला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांची घालमेल सुरू झाली. नेमके चार पाच जण तेथे होते. त्यांना थांबवून घेतले. काहींना फोन करून बोलावून घेऊन बारा पंधरापर्यंत संख्या वाढवली. दीड तास सर्वांना रांगेत बसवून घेतले. लसीकरण एक मिनिटाचं, पण दीड तास लाभार्थ्यांना वेटिंग करायला लागल्याने तेही त्रस्त झाले. कमिटी सदस्य गेल्यावर मात्र पाच मिनिटात सगळेच मोकळे झाले.
(भारत चव्हाण)