कुजबूज - भारत चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:35+5:302021-09-04T04:30:35+5:30
शिवाजी पेठेतील दोन बंधूंमधील राजकीय इर्षा इरेला पेटलीय. त्याला कारण ठरलीय ती महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक! सर्वात आधी गांधी ...
शिवाजी पेठेतील दोन बंधूंमधील राजकीय इर्षा इरेला पेटलीय. त्याला कारण ठरलीय ती महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक! सर्वात आधी गांधी मैदानाच्या विकासावरून दोघांत वादविवाद रंगला. एकाने दीड कोटींचा निधी आणून खर्च केल्याचा दावा केला, तर दुसऱ्याने एक कोटी मंजूर करून आणल्याचा फलक लावला. आता एकाने मोफत कोविड लसीकरणाचे शिबिर आयोजित केले, तर लगेचच दुसऱ्यानेही अशाचप्रकारचे शिबिर आयोजित केले आहे. दोघांची शिबिरे एकचदिवशी एकाच भागात होत आहेत. राजकारणात, समाजकारणात चांगल्या कामाची इर्षा जरुर असावी. ती असलीच पाहिजे. एकमेकांचा राग, द्वेष, मत्सर करण्यापेक्षा अशी इर्षा कधीही चांगलीच म्हणायची. नागरिकांना त्याशिवाय चांगल्या सुविधा मिळणार नाहीत. दोन बंधूंमधील या विधायक इर्षेची पेठेत मात्र वेगळ्या अर्थाने चर्चा रंगली नाही तर नवलच!